
ind vs sl
कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात मोठा वाद झाला. याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. आता या प्रकरणावर आयसीसीने दोन्ही खेळाडूंवर मोठी कारवाई केली आहे.
सामना सुरू झाल्यावर यशस्वी जयस्वाल 45 रन्स करून आउट झाला. त्यावेळेस असिथा फर्नांडो गोलंदाजी करत होता. जयस्वाल आउट झाल्यावर असिथा फर्नांडोने त्याला आक्रमक शैलीत निरोप दिला. त्यामुळे यशस्वीने देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक वाढली. मैदानावरील इतर खेळाडू आणि अंपायर यांनी त्या दोघांना आवरले. या प्रकरणाची आयसीसीने गंभीर दखल घेतली आहे.
Yashasvi Jaiswal gets a two-Test ban after hitting Asitha Fernando during an argument.
He has been charged with a Level 2 offence.#INDvsSL #YashasviJaiswal pic.twitter.com/M0qDmD4INI — Arya Ek Deewana (@arya_ekdeewana1) August 24, 2026
आयसीसीने दोन्ही खेळाडू दोषी आढळले असल्याचे सांगितले. यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो या दोन खेळाडूंच्या मॅच फी वर आयसीसीने 25 टक्के दंड आकारला आहे. तसेच दोघांच्या खात्यांमध्ये 1-1 डिमेरिट पॉईंट्स देखील दिला आहे. तसेच आयसीसी नियम 2 .12 चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली गेली आहे. दोन्ही खेळाडूंवर गेल्या वर्षभरात शिस्तभंगाचा कोणताही आरोप किंवा तक्रार किंवा तसे वर्तन नव्हे. त्यामुळे दोघांवरी पुढील सामने खेळण्यासाठी बंदी घालण्यात आलेली नाहीये.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. केएल राहुल बाद झाल्यानंतरही जयस्वाल मोठे फटके खेळत राहिला. यानंतर, १७ व्या षटकात असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर जैस्वाल क्लीन बोल्ड झाला. ५३ चेंडूंमध्ये ४५ धावा करून जयस्वाल बाद झाला.