Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Imran khan Health : ‘योग्य उपचार आणि आदर मिळावा….; इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल भारताच्या ‘दादा’कडून चिंता व्यक्त 

पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्तसमोर आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल आता भारताचा माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने भाष्य केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 17, 2026 | 08:34 PM
Imran Khan Health: 'Proper treatment and respect should be given...'; India's 'Dada' expresses concern about Imran Khan's health

Imran Khan Health: 'Proper treatment and respect should be given...'; India's 'Dada' expresses concern about Imran Khan's health

Follow Us
Follow Us:

Sourav Ganguly concerned about Imran Khan’s health : पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती सध्या चांगली नाही. त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक वृत्तसमोर येत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत क्रीडा क्षेत्रातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह १४ माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तान सरकारकडे इम्रान खान यांच्या चांगल्या उपचारांसाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर आता भारताचा माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली देखील यावर भाष्य केले आहे. भारताच्या या दादाने म्हटले आहे की,  त्यांना योग्य वैद्यकीय सेवा आणि आदर मिळाला पाहिजे.

हेही वाचा : IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

माध्यमांशी बोलताना गांगुली म्हणाला की, “मला आशा आहे की त्यांची प्रकृती सुधारेल आणि त्यांना योग्य उपचार देखील मिळतील. त्यांनी प्रथम पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून आणि नंतर पंतप्रधान म्हणून जागतिक स्तरावर पाकिस्तानला ओळख मिळवून दिली आहे. म्हणूनच, मला वाटते की त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे.”

माजी कर्णधारांनी केली  इम्रान खानबद्दल चिंता व्यक्त

सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह १४ माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांकडून इम्रान खानसाठी चांगले उपचार आणि मानवी उपचारांसाठी पाकिस्तान सरकारकडे आवाहन करण्यात आले होते. एका पानाच्या संयुक्त निवेदनात या माजी कर्णधारांनी १९९२ च्या विश्वचषक विजेत्या कर्णधारासाठी वैद्यकीय, कायदेशीर आणि मानवतावादी संरक्षणाची मागणी केली आहे. वृत्तांनुसार, इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात आहेत आणि अलीकडेच त्यांच्या आरोग्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्यामध्ये त्यांची दृष्टी बिघडल्याच्या बातम्यांचा देखील समावेश आहे.

त्यांच्या निवेदनात, माजी कर्णधारांनी लिहिले आहे की, इम्रान खान यांना “पात्र तज्ञांकडून तात्काळ, पुरेशी आणि सतत वैद्यकीय सेवा” प्रदान करण्यात आली पाहिजे. शिवाय, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, कुटुंबासोबत नियमित भेटींसह, अटकेच्या मानवी आणि आदरयुक्त परिस्थिती सुनिश्चित करायला पाहिजे. त्यांच्या आरोग्याबद्दलच्या अलीकडील अहवालांमुळे, विशेषतः त्यांच्या अटकेदरम्यान त्यांच्या दृष्टीमध्ये गंभीर बिघाड झाल्याने त्यांना खोल चिंता निर्माण झाली आहे.

इम्रान खान यांना आदराने वागवावे : सौरभ गांगुली

१४ माजी कर्णधारांनी लिहिले, “क्रिकेटपटू म्हणून, आम्हाला निष्पक्ष खेळ, आदर आणि प्रतिष्ठेची मूल्ये समजतात. इम्रान खानच्या दर्जाच्या व्यक्तीचा आदर कारायला पाहिजे.  त्यांनी १९९२ च्या क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, जो कौशल्य, नेतृत्व आणि खिलाडूवृत्तीचे प्रतीक आहे.”

हेही वाचा : ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पावसामुळे आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द! झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री

इम्रान खान यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी पाकिस्तान सरकारला पत्र लिहिणाऱ्या माजी कर्णधारांमध्ये ग्रेग चॅपेल, मायकेल आथर्टन, अॅलन बॉर्डर, मायकेल ब्रेअरली, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, डेव्हिड गॉवर, किम ह्यूजेस, नासेर हुसेन, क्लाइव्ह लॉयड, स्टीव्ह वॉ आणि जॉन राईट यांचा समावेश आहे.

Web Title: Imran khan health sourav ganguly expressed concern about imran khans health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • health care news
  • Imran khan
  • IND VS PAK
  • Saurabh Ganguly

संबंधित बातम्या

Asia Cup आणि Asian Games साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; फातिमा सनाचं कमबॅक, ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक महामुकाबला
1

Asia Cup आणि Asian Games साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; फातिमा सनाचं कमबॅक, ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक महामुकाबला

Health News: घरात पडली अन् CT स्कॅनमध्ये धक्कादायक सत्य समोर आलं; 72 वर्षीय महिलेच्या फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूपर्यंत पोहोचला
2

Health News: घरात पडली अन् CT स्कॅनमध्ये धक्कादायक सत्य समोर आलं; 72 वर्षीय महिलेच्या फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूपर्यंत पोहोचला

IND vs PAK: चाहत्यांचा होऊ शकतो हिरमोड! एशियन गेम्समध्ये भारत-पाकिस्तान टक्कर Medal Match दरम्यान
3

IND vs PAK: चाहत्यांचा होऊ शकतो हिरमोड! एशियन गेम्समध्ये भारत-पाकिस्तान टक्कर Medal Match दरम्यान

३५ वर्षीय महिलेच्या ‘झटक्यां’मागे आढळला दुर्मिळ ऑटोइम्यून मेंदूविकार; किम्स हॉस्पिटलमध्ये वेळेत निदानामुळे प्रकृतीत सुधारणा
4

३५ वर्षीय महिलेच्या ‘झटक्यां’मागे आढळला दुर्मिळ ऑटोइम्यून मेंदूविकार; किम्स हॉस्पिटलमध्ये वेळेत निदानामुळे प्रकृतीत सुधारणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.