
IND A vs PAK A : भारताच्या रायझिंग स्टार्सने अखेरपर्यंत झुंज दिली; पाकड्यांना सहजा विजय मिळवू दिला नाही
IND A vs PAK A: रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानने भारतावर 48 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेल्या 314 धावांचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच धक्के बसले. धक्क्यावर धक्के पडत असताना कर्णधार तिलक वर्मा (100) आणि शाहबाज अहमद (56) यांनी सातव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचत पाकिस्तानी गोलंदाजांना रडवले. सुरुवातीच्या फलंदाजांमध्ये फक्त एकमेव अभिषेक शर्मा (70) चांगला खेळला. इतर फलंदाजांनी आपले योगदान दिले असते तर निकाल काही वेगळाच लागला असता.
तत्त्पूर्वी, पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व माझ सदाकत (59), हसन नवाज (78) आणि फरान युसूफ (56) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सर्वबाद 314 धावांचं लक्ष्य भारतासमोर ठेऊ शकला.
दोहा येथील एशियन टाऊन क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताची सुरुवात म्हणावी तशी चांगली राहिली नाही. नेपाळप्रमाणेच याही सामन्यात सलामीला आलेला वैभव सूर्यवंशी (11) चमकदार खेळी करू शकला नाही. सुरुवातीपासूनच तो दबावात दिसत होता. मोहम्मद रंधावाच्या गोलंदाजीवर चुकीचा शॉट खेळत तो अब्दुल समदकरवी झेलबाद झाला.
तर नेपाळविरुद्धच्या सामन्यातही स्वस्तात बाद झालेला आयुष बदोनी याही सामन्यात भोपळाही न फोडताच माघारी परतला. तसेच नेपाळविरुद्ध शतकी खेळी करणारा कुमार कुशाग्र (2) या सामन्यात चमकदार कामगिरी करू शकला नाही.
सुरुवातीला पडलेल्या दोन धक्क्यातून कसं बसं सावरत अभिषेक शर्माने आपल्या नेहमीच्या अंदाजात बॅटींग सुरुवात केली. त्याने तिसऱ्या विकेटसाठी तिलक वर्माच्या साथीने 67 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, 42 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकारांसह 70 धावा करणारा अभिषेक अतीआक्रमकतेच्या नादात झेलबाद झाला.
अभिषेक बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज कुमार कुशाग्र व रिंकु सिंह (6) सपशेल फेल ठरले. त्यांना तिलक वर्माला साथ देता आली नाही.
मधल्या काळात शाहबाज अहमद (56) ने तिलक वर्माला चांगली साथ दिली. तसंच एक खणखणीत अर्धशतकही शाहबाजने झळकावले. त्याने तिलकच्या स्थानी सातव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचली. त्यांच्या या खेळीमुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणीच पळाले होते. 44 व्या षटकात शाहबाज बाद झाला. त्यानंतर मागचे फलंदाज तिलकला साथ देऊ शकले नाहीत. तिलकने अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून सामना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला. त्याने 149 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. दरम्यान, भारताने एकतर्फी वाटणाऱ्या सामन्यात अखेरपर्यंत झुंज देत सर्वबाद 265 धावापर्यंत मजल मारली.
Ans: भारत ए आणि पाकिस्तान ए यांच्यात एसीसी रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेत सामना झाला.
Ans: वैभव सूर्यवंशी 11 धावांवर बाद झाला, तर आयुष बदोनीला खातेही उघडता आले नाही. कुमार कुशाग्रलाही केवळ दोन धावा करता आल्या.
Ans: तिलक वर्मा आणि शाहबाज अहमद यांनी सातव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. शाहबाजने 56 धावांची खेळी केली.