Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा अंडर-19 संघ जाहीर! 2 कसोटी…3 एकदिवसीय सामने खेळणार

टीम इंडियाची घोषणा आधीच झाली आहे आणि आता ऑस्ट्रेलियाच्या अंडर १९ संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. मोठी गोष्ट म्हणजे भारतीय वंशाचे दोन खेळाडू देखील पिवळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसतील.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 08, 2025 | 10:10 AM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या युवा संघाचा नुकताच इंग्लड दौरा पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने या दौऱ्यावर कमालीची कामगिरी केली होती. यामध्ये भारताच्या संघाने एकदिवसीय मालिका जिंकली, तर कसोटी मालिका अनिर्णयित राहिली. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या युवा संघांमध्ये मालिका रंगणार आहे. टीम इंडियाची घोषणा आधीच झाली आहे आणि आता ऑस्ट्रेलियाच्या अंडर १९ संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. मोठी गोष्ट म्हणजे भारतीय वंशाचे दोन खेळाडू देखील पिवळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसतील.

ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाची घोषणा

ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावर पोस्ट करून भारताविरुद्ध खेळणाऱ्या १५ सदस्यीय अंडर-१९ संघाची घोषणा केली आहे. भारतीय वंशाचे दोन खेळाडू यश देशमुख आणि आर्यन शर्मा ऑस्ट्रेलियाच्या जर्सीमध्ये खेळतील.

ऑस्ट्रेलियन अंडर-१९ संघ: सायमन बज, अ‍ॅलेक्स टर्नर, स्टीव्ह होगन, विल मलाज्झुक, यश देशमुख, टॉम होगन, आर्यन शर्मा, जॉन जेम्स, हेडन शिलर, चार्ल्स लॅचमंड, बेन गॉर्डन, विल बॅरोम, केसी बार्टन, अ‍ॅलेक्स ली यंग आणि जेडेन ड्रेपर

लैगिंक शोषणाच्या आरोपाखाली पाकिस्तानी क्रिकेटपटूला ब्रिटनमध्ये अटक, पासपोर्ट जप्त; पीसीबीने केले निलंबित

प्रवास राखीव: झेड हॉलिक, टॉम पॅडिंग्टन आणि ज्युलियन ऑसबोर्न

ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघातील सामना कधी होईल?

ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या युवा खेळाडूंमधील मालिका २१ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. दोन्ही १९ वर्षांखालील संघ एकूण ३ एकदिवसीय सामने आणि २ चार दिवसांचे कसोटी सामने खेळणार आहेत. संपूर्ण वेळापत्रक खाली दिले आहे:

एकदिवसीय मालिका

पहिला युवा एकदिवसीय सामना: २१ सप्टेंबर २०२५ (इयान हीली ओव्हल, ब्रिस्बेन)

दुसरा युवा एकदिवसीय सामना: २४ सप्टेंबर २०२५ (इयान हीली ओव्हल, ब्रिस्बेन)

तिसरा युवा एकदिवसीय सामना: २६ सप्टेंबर २०२५ (इयान हीली ओव्हल, ब्रिस्बेन)

The next batch of future stars ✨ Congrats to all selected in a 15-man U19 squad ahead of an upcoming series against the India U19s in Brisbane and Mackay. pic.twitter.com/PoCa2d2Szk — Cricket Australia (@CricketAus) August 8, 2025

कसोटी मालिका

पहिली युवा कसोटी: ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ (इयान हिली ओव्हल, ब्रिस्बेन)

दुसरी युवा कसोटी: ७ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५ (ग्रेट बॅरियर रीफ अरेना, मॅके)

भारतीय अंडर-१९ संघाची घोषणा एका आठवड्यापूर्वी झाली होती. गेल्या आठवड्यात बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. आयुष म्हात्रे भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. वैभव सूर्यवंशीसह संघात अनेक प्रतिभावान नावे आहेत.

भारतीय 19 वर्षाखालील संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, नमन पुष्पनजीत पटेल, हेमन कुमार पटेल, हेन कुमार, डी. खिलन पटेल, उद्धव मोहन आणि अमन चौहान

Web Title: Ind vs aus australia u19 squad announced for series against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 10:10 AM

Topics:  

  • Ayush Mhatre
  • cricket
  • India Vs Australia
  • Sports
  • Team Australia
  • Team India
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर
1

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर

Ashes Series : नवीन वर्षाच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या ऑफस्पिनरचा समावेश! वाचा सविस्तर
2

Ashes Series : नवीन वर्षाच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या ऑफस्पिनरचा समावेश! वाचा सविस्तर

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी  कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन
3

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन

पाकिस्तानच्या माजी प्रशिक्षकाने उघडले PCB चे काळे सत्य! पद सोडण्याचे खरे कारण केले उघड, वाचा सविस्तर
4

पाकिस्तानच्या माजी प्रशिक्षकाने उघडले PCB चे काळे सत्य! पद सोडण्याचे खरे कारण केले उघड, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.