Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : ‘किंग’ कोहलीला विश्वविक्रमाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचणार इतिहास…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. पहिला  सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला विक्रम रचण्याची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 17, 2025 | 04:16 PM
IND vs AUS: 'King' Kohli gets a world record opportunity; Will create history in international cricket in ODI against Australia...

IND vs AUS: 'King' Kohli gets a world record opportunity; Will create history in international cricket in ODI against Australia...

Follow Us
Follow Us:
  • १९ ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिकेस सुरवात 
  • ऑस्ट्रेलिया-भारत पहिल्या सामन्यात विराट कोहलीला विक्रम रचण्याची संधी 
  • पहिल्या सांमन्यापूर्वी रोहित-विराटचा एकत्र सराव 
Virat Kohli has a chance to break a world record : भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यात तीन  सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला  सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा किंग विराट कोहलीला इतिहास रचण्याची नामी संधी चालून आली आहे. जर विराट कोहलीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकवले तर तो एक विश्वविक्रम रचणार आहे. विराट कोहलीच्या खात्यावर आधीच ५१ एकदिवसीय शतके जमा आहेत. जर तो शतक झळकावू शकला तर तो जागतिक क्रिकेटमध्ये एकाच स्वरूपात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम रचणार आहे.

हेही वाचा : ४० वर्षीय फलंदाजाचा मोठा कारनामा! रणजी ट्रॉफीमध्ये उडवली खळबळ; रचला ३२ शतकांचा डोंगर

विराट कोहली रचणार विश्वविक्रम

विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचे ५२ वे शतक झळकावण्यासाठी कोहलीला एका शतकाची आवश्यकता आहे. २०२३ च्या न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक उपांत्य सामन्यामध्ये कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम (४९) पिछाडीवर टाकत या स्वरूपात ५० शतके झळकावणारा पहिला फलंदाज बनला होता. आता, जर कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आणखी एक शतक ठोकले तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून काढेल आणि सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनणार आहे. सध्या, दोन्ही भारतीय दिग्गज कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी ५१ शतकांसह बरोबरीत आहेत.

हेही वाचा : IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची झोप उडवणारे ‘ते’ चार भारतीय फलंदाज माहिती आहेत का? मैदानावर असायचे आक्रमक; पहा आकडेवारी

कोहली आणि रोहित यांनी सराव सत्रात गाळला घाम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत  सर्वांच्या नजरा रोहित आणि कोहली यांच्यावर असणार आहेत.  जे फेब्रुवारी-मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारताकडून शेवटचे खेळलेले होते आणि आता ते फक्त ५० षटकांच्या स्वरूपातचे खेळणार आहेत. दोन्ही माजी भारतीय कर्णधारांनी नेटमध्ये सुमारे ३० मिनिटे फलंदाजीचा सराव केला. २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ बुधवार आणि गुरुवारी दोन गटात येथे दाखल झाला आहे.  नेटमध्ये सराव सत्रात वेळ घालवल्यानंतर रोहित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी दीर्घ चर्चा करताना देखील दिसून आला.

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ खालीलप्रमाणे

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)

Web Title: Ind vs aus virat kohli gets a chance to break a world record in odis against australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • India Vs Australia
  • Virat Kohli
  • world record

संबंधित बातम्या

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?
1

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात
2

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
3

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

एक शतक अन् विक्रमांची रांग! Virat Kohli ने ५ मोठे रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे
4

एक शतक अन् विक्रमांची रांग! Virat Kohli ने ५ मोठे रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.