आकाश दीपने आणि बेन डकेट(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे खेळवला जात आहे. भारताचा पहिला डाव २२४ धावांत संपुष्टात आला आहे. प्रतिउत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात ८ गडी गमावून २४२ धावा केल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययाने खेळ थांबवण्यात आला आहे. इंग्लंडचे अजून २ विकेट बाकी आहेत. तत्पूर्वी इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने अर्धशतक झळकावले आहे. तर त्याचा सहकारी बेन डकेटने ४३ धावा केल्या आहेत. यादरम्यान एक प्रभाकर घडला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये इंग्लंडचा सलामीवीर बेन डंकेटला बॅड केल्यावर आकाश दीप त्याच्याशी बोलताना दिसत आहे.
इंग्लंड क्रिकेट टीमने पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताला पहिल्या डावात २२४ धावांवर गुंडाळलं.त्यानंतर प्रतिउत्तरात इंग्लंडच्या सलामी जोडीने स्फोटक खेळी करत भारतीय गोलंदाजांना चांगलेच धुतले. त्यामुळे भारताची चिंता वाढली होती. मात्र, भारताचा गोलंदाज आकाश दीपने बेन डकेटला बाद करत ही जोडी फोडली आणि भारताला यश मिळवून दिले. आकाशने बेनला बाद केल्यावर बेन डकेटसोबत असं काही केलं ज्याची आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताची सुरवात चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल २ धावांवर बाद झाला. त्यानंतर एकामागून एक विकेट जात राहिल्या. केएल राहुल १४, साई सुदर्शन ३८, शुभमन गिल २१, करुण नायर ५७, वॉशिंग्टन सुंदर २६, रवींद्र जडेजा ९, ध्रुव जुरेल१९, प्रसिद्ध कृष्णा०, मोहम्मद सिराज ० धावा करू शकले. तर आकाश दीप ० धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून गस अॅटकिन्सन २२ षटकात ३३ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. तर जोश टंगने ३ विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस वोक्सने १ विकेट घेतली.
A much needed breakthrough for India 🔥
And a cheeky send-off for Ben Duckett 😜#SonySportsNetwork #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/9YaTjcEYOn
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 1, 2025
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताची सुरवात चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल २ धावांवर बाद झाला. त्यानंतर एकामागून एक विकेट जात राहिल्या. केएल राहुल १४, साई सुदर्शन ३८, शुभमन गिल २१, करुण नायर ५७, वॉशिंग्टन सुंदर २६, रवींद्र जडेजा ९, ध्रुव जुरेल१९, प्रसिद्ध कृष्णा०, मोहम्मद सिराज ० धावा करू शकले. तर आकाश दीप ० धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून गस अॅटकिन्सन २२ षटकात ३३ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. तर जोश टंगने ३ विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस वोक्सने १ विकेट घेतली.
भारत प्लेइंग ११
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग ११
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.