बेन डकेट(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने मोठा कारनामा केला आहे. बेन डकेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामन्याच्या चौथ्या डावात शतक करणारा इंग्लंडचा पहिला सलामीवीर ठरला आहे. . २०१९ नंतर इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण ६६ सामने खेळलेले आहेत. परंतु डकेटपूर्वी कोणत्याही सलामीवीर फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
यापूर्वी कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात शतक करणारा इंग्लंडचा शेवटचा सलामीवीर अॅलिस्टर कुक राहिला आहे. कुकने २०१० मध्ये मिरपूर येथे बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी करून दाखवली होती. त्या सामन्याच्या दुसऱ्या डावात कुक १०९ धावांवर नाबाद राहिला होता. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडसाठी ६२ धावा करणाऱ्या डकेटने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. त्याने १७० चेंडूत १४९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २१ चौकार आणि १ षटकार मारला आहे. लंचपर्यंत त्याने जॅक क्रॉली (६५) सोबत पहिल्या विकेटसाठी ४०.५ षटकांत १८८ धावा जोडल्या होत्या. बेन डकेटला शार्दुल ठाकूरने माघारी पाठवले. तसेच त्याआधी जॅक क्रॉली (६५) ला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले.
हेही वाचा : IND vs ENG : भारताविरुद्ध इंग्लंडचा अनोखा विक्रम; ९३ वर्षांत एकदाच केली ‘अशी’ कामगिरी..
बेन डकेटचे हे सहावे कसोटी शतक ठरले आहे. त्याचबरोबर भारताविरुद्ध त्याच्याकडे दोन शतके जमा आहेत. २०२५ मध्ये त्याने आतापर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या १९ सामन्यांच्या २० डावांमध्ये एकूण १००० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. डकेटने २०२५ मध्ये इंग्लंडसाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये संघासाठी त्याने शतकी खेळी केली आहे.
डावपाखाडीचा फलंदाज बेन डकेट मंगळवारी त्याच्या शतकाचे मोठ्या शतकात रूपांतर करू इच्छितो आणि इंग्लंडला ३७१ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पाठलाग करण्यास आणि लीड्समधील हेडिंग्ले येथे भारताविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळवण्यास मदत करू इच्छितो. १४९ धावा काढल्यानंतर बेन डकेट बाद झाला. आता इंग्लंडच्या २६९ धावा झाल्या आहेत. त्यात त्यांनी ४ विकेट्स गामावल्या आहेत. आता मैदानात जो रूट १४ धावा तर बेन स्टोक्स १३ धावांवर खेळत आहेत. संघाला विजयासाठी आणखी १०२ धावांची आवश्यकता आहे.
A dashing ton from Ben Duckett to set the foundation for England’s chase at Headingley 🔥#ENGvIND 📝: https://t.co/62moN1iHJB pic.twitter.com/qJqfHREnQZ
— ICC (@ICC) June 24, 2025
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.