केएल राहुल बाद झाल्यावर जल्लोष करताना इंग्लंड संघ.. (फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जात आह. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करून इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर संपुष्टात आणला. भारतकडून वॉशिंग्टन सुंदरने ४ बळी टिपून शानदार कामगिरी केली. प्रतिउत्तरात भारताची सुरवात खूप वाईट झाली. चौथ्या दिवसाअखेर ४ गडी गमावत ५८ धावा केल्या होत्या.आज पाचव्या दिवशी भारत मैदानावर उतरला. आज देखील भारतीय संघाची सुरवात अतिशय वाईट झाली. भारताला १२६ धावांची गरज असताना रिषभ पंत आणि त्यांनतर भारतीय संघाचा आधारस्तंभ केएल राहुल देखील माघारी परतला. भारताच्या आता ३ विकेट्स बाकी आहे. इंग्लडचे गोलंदाज घातक मारा करताना दिसत आहे. रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी क्रीजवर उपस्थित आहेत.
हेही वाचा : IND Vs ENG :चालू सामन्यात गंभीरचे नकोसे हावभाव! मुख्य प्रशिक्षकाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह; पहा Video
तत्पूर्वी, इंग्लंडने तिसऱ्या दिवशीच्या अखेरीस बिनबाद २ धावावरून चौथ्या दिवसाचा खेळ सुरु केला. तेव्हा इंग्लडची सुरवात फारसी चांगली झाली नाही. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट १२ धावांवर आउट झाला. त्यानंतर ऑली पोपला ४, झॅक क्रॉली २२, हॅरी ब्रुक २३, जो रूट ४०, हॅरी बेन स्टोक्स ३३, जेमी स्मिथ ८, ख्रिस वोक्स ८, कार्स १, शोएब बशीर २ धावा करून बाद झाले, तर जोफ्रा आर्चर ५ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंड १९२ धावांवर सर्वबाद झाला. त्यांनी भारताला १९२ धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने शानदार कामगिरी केली. त्याने २२ धावा देत सर्वाधिक ४ बळी मिळवले. तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २, नितीश कुमार रेड्डी आणि आकाश यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
इंग्लंडच्या १९३ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी मैदानात उतरला. भारताची सुरवात खूप वाईट झाली. यशस्वी जैस्वाल शून्यावर जोफ्रा आर्चरचा शिकार ठरला. त्यांनतर सलामीवीर केएल राहूल आणि करुण नायर यांनी काही वेळ डाव सांभाळला, परंतु नायरला कार्सने १४ धावांवर बाद केले. त्यानंतर संघाचा कर्णधार शुभमन गिल फलंदाजीसाठी आला मात्र तो केवळ ६ धावा करू शकला. त्याला कार्सने आपली शिकार बनवले. त्यांनतर नाईट वॉचमन म्हणून आकाश दीप मैदानात आला. मात्र त्याला देखील स्टोक्सने आपला बळी बनवले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतने ४ विकेट्स गमावून ५८ धावा केल्या होत्या.
पाचव्या दिवसाची सुरवात झाली तेव्हा भारताला १३५ धावांची गरज असताना मैदानात राहुल आणि पंत खेळत होते. तेव्हा भारताला पाचव्या दिवशी पॅन्टच्या रूपात पहिला धक्का बसला. त्याला ९ धावांवर जोफ्रा आर्चरने माघारी पाठवले. त्याच्यानंतर केएल राहुल जो चांगली फलंदाजी करत होता. त्याला बेन स्टोक्सने बॅड केले. राहुल बॅड झाल्याने संघाची अवस्था खूप बिकट झाली. राहुल नंतर वॉशिंग्टन सुंदर मैदानात आला. भारताला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या परंतु तो ४ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला आणि भारताच्या अडचणी अधिक वाढल्या. आता क्रीजवर रवींद्र जडेजा १३ तर नितीश कुमार रेड्डी ३ धावांवर खेळत आहे. भारताला विजयासाठी ९६ धावांची गरज आहे तर इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ३ विकेट्सची गरज आहे. आतपर्यंत इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३, बेन स्टोक्स आणि कार्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत.