Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 1st T20I : अभिषेक शर्माने रचला विक्रम! T20 मध्ये ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील ठरला पहिलाच फलंदाज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने अर्धशतक ठोकून एक खास विक्रम रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 21, 2026 | 09:45 PM
IND vs NZ 1st T20I: Abhishek Sharma created a record! He became the first batsman in the world to achieve this remarkable feat in T20s.

IND vs NZ 1st T20I: Abhishek Sharma created a record! He became the first batsman in the world to achieve this remarkable feat in T20s.

Follow Us
Follow Us:

Abhishek Sharma made history in Nagpur : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू झाली आहे, या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात  टॉस गमावून भारताने अभिषेक शर्माच्या ८४ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर २३८ धावा उभ्या केल्या. अभिषेक शर्माने या खेळीने इतिहास रचला आहे. या खेळी दरम्यान त्याने फक्त २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एक मोठा टप्पा गाठला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २५ चेंडूंपेक्षा कमी वेळेत सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा : IND vs NZ 1st T20I : नागपूरमध्ये अभिषेक-रिंकूची स्फोटक खेळी! न्यूझीलंडसमोर भारताचा 239 धावांचा डोंगर

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने ३५ चेंडूत ८४ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ५ चौकार आणि ८ षटकार लगावले. या खेळीमध्ये त्याने २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ४ लगावले. यावेळी २५ चेंडू किंवा त्यापेक्षा कमी वेळेत अभिषेकचे हे आठवे अर्धशतक ठरले आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ चेंडू किंवा त्यापेक्षा कमी वेळेत सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने सात वेळा ही किमया करणाऱ्या फिल साल्टला पिछाडीवर टाकले आहे.

टी-२० मध्ये २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये सर्वाधिक अर्धशतके लगावणारे फलंदाज

  1. ८ अभिषेक शर्मा
  2. ७ फिल साल्ट
  3. ७ सूर्यकुमार यादव
  4. ७ एविन लुईस

अभिषेक शर्माच्या ८४ धावा

नागपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून  अभिषेक शर्माने ३५ चेंडूत ८४ धावा केल्या. या डावात अभिषेक शर्माने ५ चौकार आणि ८ षटकारांची अंतिषबाजी केली. अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या सर्व गोलंदाजांना आपल्या पायावर ठेवले. यासह, अभिषेक शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा : ICC T20 World Cup 2026 : बांगलादेशचा घमंड चकनाचूर! विरोधात पडली मतं; ICC कडून दुसऱ्या पर्यायाचा विचार

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार

  1. १३ रिचर्ड लेव्ही, हॅमिल्टन २०१२
  2. ८ किरॉन पोलार्ड, ऑकलंड २०२०
  3. ८ अभिषेक शर्मा, नागपूर २०२६ *

भारताच्या २३८ धावा

पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीला बोलावले. भारताकडून अभिषेक शर्माच्या ८४ धावा, रिंकू सिंगच्या नाबाद ४४ धावा, कर्णधार सूर्यकुमार यादव ३२ धावा आणि हार्दिक पंड्याने २५ धावांच्या जोरावर भारताने ७ गडी गमावून २३८ धावा केल्या. न्यूझीलंडला विजयासाठी २३९ धावा कराव्या लागणार आहे. न्यूझीलंडकडून  जेकब डफी आणि काइल जेमिसन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर ईश सोढी,  मिचेल सँटनर आणि ख्रिश्चन क्लार्क यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे…

न्यूझीलंड संघ: टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोढी, जेकब डफी

भारत संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

Web Title: Ind vs nz 1st t20i abhishek sharma created a record by scoring a half century in t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 09:44 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs NZ
  • T20 cricket

संबंधित बातम्या

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं
1

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला
2

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला

IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची खास तयारी; टेस्ट सीरिजआधी खेळणार 3 महत्त्वाचे सामने, कधी अन् कुठे भिडणार?
3

IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची खास तयारी; टेस्ट सीरिजआधी खेळणार 3 महत्त्वाचे सामने, कधी अन् कुठे भिडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.