भारताचे न्यूझीलंडसमोर २३९ धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ 1st T20I : नागपूर येथे विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने अभिषेक शर्माच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर ७ गडी गमावून २३८ धावांचा डोंगर उभा केला आहे. या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माने ३५ चेंडूत ८४ धावा फटकावल्या आहेत. न्यूझीलंडकडून जेकब डफीने २ विकेट्स घेतल्या आहेत, किवी संघाला विजयासाठी २३९ धावा कराव्या लागणार आहे.
हेही वाचा : WPL 2026 : दिल्लीच्या फलंदाजाला पंचांशी वाद भोवला! ‘या’ खेळाडूला ठोठावण्यात आली मोठ्या दंडासह शिक्षा
नागपूर येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. भारताच्या डावाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामीवीरांनी केली. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. १८ धावांवर भारताला संजूच्या रूपात पहिला धक्का बसला. ७ चेंडूत १० धावा करून संजू माघारी गेला. त्यानंतर दीर्घ काळानंतर संघात परतलेला ईशान किशन मैदानात आला, परंतु तो देखील काही खास करू शकला नाही. ५ चेंडूत ८ धावा करून तो बाद झाला.
एका बाजून विकेट्स पडत असताना दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्मा न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत होता. त्याने २२ चेंडूत आपले ७ वे टी२० अर्धशतक पूर्ण केले. त्याला दुसरीकडून त्याला सूर्यकुमार यादवने चांगली साथ दिली. या दोघांनी ९९ धावांची भागीदारी केली. कर्णधार सूर्यकुमार यादव २२ चेंडूत ३२ धाव करून बाद झाला. त्याला कर्णधार मिचेल सँटनरने माघारी पाठवले. अभिषेक मात्र चौथ्या गेअरमध्ये खेळत होता. मैदानावर आलेला हार्दिक पांड्याने देखीळ आक्रमक फलंदाजी केली. पंड्या आणि शर्माने २४ धावांची भागीदारी केली. दरम्यान, अभिषेक शर्मा ३५ चेंडूत ८४ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत ५ चौकार आणि ८ षटकार लगावले. शर्माला ईश सोधीने आपली शिकार बनवले.
त्यानंतर शिवम दुबे ९ धावा, अक्षर पटेल ५ धावा करून बाद झाले. त्यानंतर रिंकू सिंगने डाव सांभाळत संघाला २३८ धावांपर्यंत पोहचवले. त्याने २० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकरांच्या मदतीने ४४ धावांची खेळी करत नाबाद राहिला. यामध्ये तर अर्शदीप सिंग देखील ६ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि काइल जेमिसन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर ईश सोढी, मिचेल सँटनर आणि ख्रिश्चन क्लार्क यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : ICC T20 World Cup 2026 : बांगलादेशचा घमंड चकनाचूर! विरोधात पडली मतं; ICC कडून दुसऱ्या पर्यायाचा विचार
न्यूझीलंड संघ: टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोढी, जेकब डफी
भारत संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह






