
IND vs NZ 1st T20I: 'Mr. 360' will set a record as soon as he steps onto the field in Nagpur! He will become the first Indian player to achieve 'this' feat.
Suryakumar Yadav is going to make history : आजपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. आज, २१ जानेवारी रोजी नागपुरात पहिला सामाना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव मैदानावर उतरताच एक मोठा विक्रम रचणार आहे. सूर्यकुमार यादव आज त्याचा १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव नागपुरात आपल्या सामन्याचे शतक पूर्ण करणार आहे.
सूर्यकुमार यादवने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ९९ टी-२० सामने खेळलेले आहेत. नागपुरात खेळला जाणारा हा सामना त्याच्या कारकिर्दीतील १०० वा टी-२० सामना असणार आहे. नागपुरात तो टी-२० सामन्यांमध्ये शतक करणार आहे. असा पराक्रम करणारा सूर्यकुमार यादव तो चौथा भारतीय खेळाडू ठरेल. सूर्यकुमार यादवच्या आधी, रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी भारतासाठी १०० किंवा त्याहून अधिक टी-२० सामने खेळण्याची किमया साधली आहे.
हेही वाचा : IND vs NZ 1st T20I : ‘वर्ल्डकपपूर्वी भारतामध्ये खेळणे….’ न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरने व्यक्त केल्या भावना
रोहित शर्माने सर्वाधिक १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. तर त्याच्या मागे विराट कोहली १२५ सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. हार्दिक पांड्या १२४ सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. नागपूरमध्ये हार्दिक पंड्या कोहलीची बरोबरी साधणार आहे. या यादीत पाचवे स्थान माजी कर्णधार एमएस धोनीचे आहे, ज्याने ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. रोहित आणि विराटने टी-२० मधून निवृत्ती स्वीकारली आहे. सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत हार्दिकपंड्याला रोहितला मागे टाकण्याची संधी देखील आहे.
भारतीय कर्णधाराला त्याचा १०० वा टी-२० सामना संस्मरणीय बनवण्याची संधी असणार आहे. २०२५ हे वर्ष सूर्यकुमार यादवसाठी फलंदाज म्हणून निराशाजनक राहिले आहे. गेल्या वर्षी त्याने २२ डावांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकवता आलेले नाही. सूर्यकुमार यादव वर्षाच्या या पहिल्या सामन्यात आणि भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या त्याच्या १०० व्या सामन्यात तो मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी बजावली आहे. २०२१ ते २०२३ दरम्यान, सूर्यकुमार यादवने या संघाविरुद्ध ८ टी-२० सामन्यांमध्ये ४७.३३ च्या सरासरीने आणि १५३.५१ च्या स्ट्राईक रेटने २८४ धावा फटकावल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १११ धावा राहिली आहे. भारतीय कर्णधाराच्या टी-२० कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने ९९ टी-२० सामन्यांपैकी ९३ डावांमध्ये ४ शतके आणि २१ अर्धशतकांसह २,७८८ धावा काढल्या आहेत.