
photo- social media
ईशान किशनच्या जागी वैभव सूर्यवंशीला, तर मयंक यादवच्या जागी प्रिन्स यादवला संघात स्थान देण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने २० षटकांत ५ विकेट्स गमावून १८० धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी १८१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्सने पुन्हा एकदा दमदार खेळी केली. त्याने ४३ चेंडूमध्ये ७० धावा केल्या. तर, बेव्हॉन जेकब्सने ४६ चेंडूमध्ये ५८ धावा ठोकल्या.
भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. टीम सेफर्ट आणि फिन अॅलेनने न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. दुसऱ्या षटकात, अर्शदिप सिंगने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्याने टिम सेफर्टला बाद केले. सेफर्ट एका षटकारासह ६ चेंडूंमध्ये ७ धावा करून स्वस्तात बाद झाला. भुवनेश्वर कुमारने भारताला दुसरे विकेट मिळवून दिले. त्याने डॅरिल मिचेलला ६ धावांवर बाद केले आणि पुन्हा एकदा तिलक वर्माने कव्हरला झेल घेतला. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुनरागमन करताना भुवनेश्वरने घेतलेली ही पहिली विकेट होती. न्यूझीलंडची तिसरी विकेट ४१ धावांवर पडली. प्रिन्स यादववने फिन ॲलनला १६ धावांवर क्लीन बोल्ड केले.
त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि बेव्हॉन जेकब्स यांनी चौथ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडला चांगली धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फिलिप्सने ४३ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ४ षटकार ठोकत ७० धावा केल्या. डावाच्या १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीप सिंगने तंबूत पाठवले. जेकब्सने देखील जोरदार फटकेबाजी करत ४६ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या. भारतासाठी अर्शदीप सिंगने सर्वाधिक दोन विकेट्स घेतले, तर भुवनेश्वर कुमार, प्रिन्स यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. न्यूझीलंडने ५ विकेट्स गमावून १८० धावा केल्या.
भारत: संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.
न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन.