Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: भारताला मोठा झटका, ईशान किशन तिसऱ्या T20 मधून OUT, पुन्हा मिळणार Vaibhav Sooryavanshi ला संधी?

IND vs NZ: भारत विरूद्ध न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारतासाठी दुःखद बातमी असून ईशान किशन दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. मात्र वैभव सूर्यवंशीला त्याजागी संधी मिळू शकते

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 26, 2026 | 10:53 AM
ईशानऐवजी वैभवला संधी मिळण्याची शक्यता (फोटो सौजन्य - Instagram)

ईशानऐवजी वैभवला संधी मिळण्याची शक्यता (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • भारत विरूद्ध न्यूझीलंडचा तिसरा टी२० सामना २७ ऑक्टोबर रोजी 
  • ईशान किशन दुखापतीमुळे खेळणार नाही तिसरा सामना 
  • वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता 
IND vs NZ: न्यूझीलंडविरूद्ध T20I सिरीजदरम्यान भारतीय संघाला मोठा झटका मिळाला आहे. यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज ईशान किशन तिसऱ्या सामन्यातून बाद झाला आहे. BCCI ने २६ ऑक्टोबर रोजी या गोष्टीची पुष्टी दिली असून ईशान किशनला पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे अजूनही आराम मिळालेला नाही. सामना खेळण्यासाठी तो अजूनही फिट नसल्याचे समोर आले आहे. 

दुसऱ्या सामन्यात ईशानऐवजी वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली होती. मात्र तो केवळ ४ धावा करून परतला होता. पण आता पुन्हा एकदा वैभवला संधी मिळण्याची शक्यता आहे. वेलिंग्टनमध्ये होणाऱ्या या सामन्यात वैभव पुन्हा खेळू शकतो आणि यावेळी त्याच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा टी२० सामना मंगळवार अर्थात २७ ऑक्टोबर, २०२६ रोजी वेलिंग्टनमध्ये खेळला जाणार आहे. BCCI नुसार, ईशान किशनच्या उजव्या पायावर दुखापत झाली असून मांसपेशी खेचल्या गेल्या आहेत. 

IND vs NZ: १५ वर्षांच्या पोराचा मोठा पराक्रम! Vaibhav Sooryavanshi ने न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

ईशानच्या तंदुरुस्तीबद्दल BCCI ने माहिती दिली

BCCI ने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान उजव्या मांडीच्या स्नायूला झालेल्या किरकोळ दुखापतीतून ईशान किशन चांगला बरा होत आहे. तथापि, तो अद्याप खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी वेलिंग्टन येथे होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यातून तो बाहेर असेल. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे.

ईशानच्या दुखापतीबाबत दिलासादायक बाब ही आहे की, त्याची प्रकृती सुधारण्याची प्रक्रिया योग्य दिशेने पुढे जात आहे. तथापि, तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत त्याला मैदानात उतरवण्याचा धोका पत्करण्याची संघ व्यवस्थापनाची इच्छा नाही. त्याच्या पुनरागमनाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

IND vs NZ 2nd T20 : किवींना धोबीपछाड! संकटमोचक ठरले तिलक-नीतीश; टीम इंडियाने थरारक अंदाजात जिंकला दुसरा T20

कुमार कुशाग्र संघात कायम राहणार

BCCI ने स्पष्ट केले आहे की, यष्टीरक्षक-फलंदाज कुमार कुशाग्र तिसऱ्या सामन्यासाठी संघात कायम राहील. दुसऱ्या सामन्यापूर्वी ईशानच्या जागी बदली खेळाडू म्हणून कुमारचा संघात समावेश करण्यात आला होता. आता ईशानच्या अनुपस्थितीत तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ कोणती रणनीती अवलंबतो हे पाहणे बाकी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ५ सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. आता टीम इंडिया तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघ: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, अक्षर पटेल, नमन धीर, नितीश कुमार रेड्डी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, कुमार कुशाग्र.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तिसरा टी२० सामना कधी खेळवला जाणार?

    Ans: २७ ऑक्टोबर, २०२६ रोजी तिसरा टी२० सामना न्यूझीलंडविरूद्ध भारत खेळणार

  • Que: ईशान किशनला काय झाले आहे?

    Ans: BCCI ने सांगितल्यानुसार ईशान किशनच्या मांडीच्या मसल्सना दुखापत झाली आहे

  • Que: प्लेईंग ११ मध्ये वैभव सूर्यवंशी असणार का?

    Ans: ईशान किशनच्या जागी वैभवला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे

Web Title: Ind vs nz 3rd t20i ishan kishan has been ruled out vaibhav sooryavanshi can get chance again dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Ishan Kishan
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

NZ A vs IND A: बेईमानीचा कळस, देवदत्त पडिक्कल दुहेरी शतकाच्या उंंबरठ्यावर असताना चुकीचा निर्णय; अंपायरची मोठी चूक
1

NZ A vs IND A: बेईमानीचा कळस, देवदत्त पडिक्कल दुहेरी शतकाच्या उंंबरठ्यावर असताना चुकीचा निर्णय; अंपायरची मोठी चूक

Crime News: भारत-न्यूझीलंड सामन्यावरील ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
2

Crime News: भारत-न्यूझीलंड सामन्यावरील ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?
3

IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?

IND vs NZ: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या! ईशान किशन तिसऱ्या T20 लाही मुकणार? वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी?
4

IND vs NZ: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या! ईशान किशन तिसऱ्या T20 लाही मुकणार? वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.