Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 3rd Test : मुंबई कसोटीत टीम इंडिया चमकली, 9 विकेट्स गमावून न्यूझीलंडकडे 143 धावांची आघाडी

मुंबईच्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था धावसंख्या 9 गडी बाद 171 धावा अशी झाली. एकंदरीत किवी संघाची आघाडी 143 धावांपर्यंत वाढली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 02, 2024 | 07:44 PM
IND vs NZ 3rd Test 2nd Day Team India Dominates in Mumbai Test New Zealand Takes a lead of 143 runs after Losing 9 Wickets

IND vs NZ 3rd Test 2nd Day Team India Dominates in Mumbai Test New Zealand Takes a lead of 143 runs after Losing 9 Wickets

Follow Us
Follow Us:

IND vs NZ 3rd Test 2nd Day Report : मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची धावसंख्या 9 गडी बाद 171 धावा आहे. अशाप्रकारे किवी संघाची आघाडी १४३ धावांपर्यंत वाढली आहे. न्यूझीलंडकडून एजाज पटेल आणि विल्यम ओरुक नाबाद आहेत. त्याचबरोबर रवींद्र जडेजा हा भारतासाठी आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. रवींद्र जडेजाला दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट्सचे यश मिळाले. याशिवाय रवी अश्विनने 3 फलंदाजांना आपले बळी बनवले. आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदरने 1-1 विकेट घेतली. आज दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे 15 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले.

भारतीय संघाची शानदार गोलंदाजी

What a way to get the final wicket of the day 🙌 Make that 4⃣ for Ravindra Jadeja 👏👏 Scorecard – https://t.co/KNIvTEyxU7#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @imjadeja pic.twitter.com/r6sTQSHgYf — BCCI (@BCCI) November 2, 2024

 

ऋषभ पंत आणि शुभमन गिल चमकले, पण बाकीचे…
याआधी भारताने दुसऱ्या दिवसाच्या 4 बाद 84 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भारतासाठी ९६ धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. त्यामुळे भारतीय संघ अवघ्या 263 धावांवर बाद झाला.

भारतीय खेळी गडगडली

ऋषभ पंत ५९ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. तर शुभमन गिलने 146 चेंडूत 90 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार मारला. यानंतर भारतीय फलंदाजांची सतत पॅव्हेलियनमध्ये परतण्याची प्रक्रिया सुरू झाली. सर्फराज खान एकही धाव न काढता चालता झाला. रवींद्र जडेजाने 14 धावा केल्या. तर रविचंद्रन अश्विनने ६ धावांचे योगदान दिले. आकाशदीप शून्यावर बाद झाला. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने 38 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांची कामगिरी
न्यूझीलंडसाठी भारतीय वंशाचा एजाज पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. एजाज पटेलने 5 फलंदाजांना बाद केले. याशिवाय मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोधीने प्रत्येकी 1 बळी घेतला.

Web Title: Ind vs nz 3rd test 2nd day team india dominates in mumbai test new zealand takes a lead of 143 runs after losing 9 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 07:44 PM

Topics:  

  • IND vs NZ 3rd Test
  • indian cricket team
  • New Zealand
  • Ravindra Jadeja
  • Rohit Sharma
  • Shubman Gill
  • Wankhede Stadium

संबंधित बातम्या

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 
1

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 

 Ind vs Wi ODI : ‘हिटमन’ व ‘प्रिन्स’च्या शतकांचा धडाका; विंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली
2

 Ind vs Wi ODI : ‘हिटमन’ व ‘प्रिन्स’च्या शतकांचा धडाका; विंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली

Rohit Sharma: हिटमॅनच्या वादळी खेळीत West Indies बुडालं; रोहित शर्माने केला 12 हजार रन्सचा रेकॉर्ड
3

Rohit Sharma: हिटमॅनच्या वादळी खेळीत West Indies बुडालं; रोहित शर्माने केला 12 हजार रन्सचा रेकॉर्ड

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा
4

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.