Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 4th T20I : विशाखापट्टणममध्ये किवीचे भारतासमोर 216 धावांचे लक्ष्य! सेफर्ट-कॉनवे चमकले 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात आज विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य उभे केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 28, 2026 | 09:03 PM
IND vs NZ 4th T20I: New Zealand sets a target of 216 runs for India in Visakhapatnam! Seifert and Conway shine.

IND vs NZ 4th T20I: New Zealand sets a target of 216 runs for India in Visakhapatnam! Seifert and Conway shine.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NZ 4th T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे.या मालिकेतील चौथा सामना आज विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टॉस गमावणाऱ्या न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत सलामीवीर टिम सेफर्टच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ गडी गमावून २१५ धावा केल्या आहेत. भारताला हा सामना जिंकण्यासाठी २१६ धावा कराव्या लागणार आहेत. भारताकडून अर्शदीप सिंगने २ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : Ajit Pawar Plane Crash : ‘एक समर्पित नेता गमावला..’ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने क्रिकेट विश्व हळहळले

या समान्यापूर्वी भारताने नानेफक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले . भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा हा निर्णय किवीच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवत न्यूझीलंडच्या टिम सेफर्ट आणि डेव्हॉन कॉनवे या सलामीवीरांनी ८ षटकातच १०० धावा जोडल्या. या दरम्यान, पॉवरप्लेमध्ये या जोडीने भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल चढवला. पॉवरप्लेमध्ये यांनी ६ ओव्हरमध्येच ७१ धावा केल्या. टिम सेफर्ट अधिक आक्रमक दिसला. त्याने फक्त २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

Innings Break! A target of 2⃣1⃣6⃣ runs in Vizag for #TeamIndia 🎯 Chase on the other side ⏳ Scorecard ▶️ https://t.co/GVkrQKKyd6 #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/4o0jnVFbFT — BCCI (@BCCI) January 28, 2026

टिम सेफर्ट आणि डेव्हॉन कॉनवे यांनी ८.२ षटकात १०० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर डेव्हॉन कॉनवे २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाररांच्या मदतीने ४४ धावांची खेळी करून बाद झाला. त्याला कुलदीप यादवने माघारी पाठवले. त्यानंतर मैदानात आलेला रचीन रवींद्र काही खास करू शकला नाही. त्याला जसप्रीत बूमराहने बाद केले. ग्लेन फिलिप्स २४ धावा, मार्क चॅपमन ९ धावा,  कर्णधार मिशेल सॅन्टनर ११ धावा, झकरी फॉल्केस १३ धावा करून बाद झाले. परंतु एका बाजूने डॅरिल मिशेलने १८ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकरांच्या मदतीने नाबाद ३९ धावा केल्या आणि संघाचा स्कोअर २०० च्या पुढे घेऊन गेला. मॅट हेन्री ६ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १  विकेट घेतली.

हेही वाचा : ICC T-20 Ranking : ‘मिस्टर 360’ ची उंच उडी! ICC T-20 Ranking च्या TOP-10 मध्ये केली एंट्री; अभिषेक शर्माचे अव्वल स्थान कायम

संघ पुढीलप्रमाणे आहेत:

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टिम सेफर्ट (डब्ल्यू), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सॅन्टनर (क), झकरी फॉल्केस, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी

भारत प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (डब्ल्यू), सूर्यकुमार यादव (क), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह

Web Title: Ind vs nz 4th t20i new zealand sets a target of 216 runs for india in visakhapatnam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Devon Conway
  • IND vs NZ

संबंधित बातम्या

IND vs NZ 4th T20I : विशाखापट्टणममध्ये टिम सेफर्टचा धुमाकूळ! 25 चेंडूत ठोकले अर्धशतक;न्यूझीलंडच्या 8 षटकात 100 धावा
1

IND vs NZ 4th T20I : विशाखापट्टणममध्ये टिम सेफर्टचा धुमाकूळ! 25 चेंडूत ठोकले अर्धशतक;न्यूझीलंडच्या 8 षटकात 100 धावा

IND vs NZ 4th T20I : सूर्या आर्मी विजयी रथ कायम राखणार? भारताचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; न्यूझीलंड करणार फलंदाजी   
2

IND vs NZ 4th T20I : सूर्या आर्मी विजयी रथ कायम राखणार? भारताचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; न्यूझीलंड करणार फलंदाजी  

IND vs NZ 4th T20I : ‘भारताच्या फलंदाजांना रोखावे…’ चौथ्या T20I सामान्यापूर्वी न्यूझीलंडच्या फलंदाजी प्रशिक्षकाचे संघाला आवाहन
3

IND vs NZ 4th T20I : ‘भारताच्या फलंदाजांना रोखावे…’ चौथ्या T20I सामान्यापूर्वी न्यूझीलंडच्या फलंदाजी प्रशिक्षकाचे संघाला आवाहन

IND vs NZ 4th T20I : भारतीय फिरकीपटू कामगिरी उंचावणार? न्यूझीलंडविरुद्ध दबदबा ठेवणार सूर्याआर्मी 
4

IND vs NZ 4th T20I : भारतीय फिरकीपटू कामगिरी उंचावणार? न्यूझीलंडविरुद्ध दबदबा ठेवणार सूर्याआर्मी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.