Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 5Th 20I : अर्शदीप सिंगच्या 5 विकेट्सवर पडले विरजण; T20I इतिहासात नोंदवला लाजिरवाणा विक्रम 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना भारताने ४६ धावांनी जिंकला. या सामन्यात अर्शदीप सिंगने ५ विकेट्स घेतल्या, त्री देखील त्याच्या नावे नकोसा विक्रम रचला गेला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 01, 2026 | 05:34 PM
IND vs NZ 5Th 20I : अर्शदीप सिंगच्या 5 विकेट्सवर पडले विरजण; T20I इतिहासात नोंदवला लाजिरवाणा विक्रम 
Follow Us
Follow Us:

IND vs NZ 5Th 20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील  पाचवा आणि शेवटचा सामना काल शनिवारी खेळला गेला. या सामन्यात भारताने ४६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह, भारतीय संघाने टी२०आय मालिकेत न्यूझीलंडवर ४-१ अशी सरशी साधली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पाच विकेट काढल्या. त्याने ही कामगिरी केली असली तरी देखील त्याच्या नावे एक लाजिरवाणा पराक्रम नोंदवला गेला.

हेही वाचा : Sports Budget 2026 : निर्मला सीतारमण यांनी क्रीडाप्रेमींची लावली लॉटरी! SME साठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचे पॅकेज केले जाहीर

तिरुअनंतपुरममध्ये भारताच्या विजयात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ४ षटकांत ५१ धावा देऊन  ५ विकेट घेतल्या. या कामगिरीसह, अर्शदीप आंतरराष्ट्रीय टी२०आय सामन्यात सर्वाधिक धावा देणारा आणि ५ किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. यापूर्वी, हा नकोसा विक्रम वेस्ट इंडिजच्या अल्झारी जोसेफच्या नावे जमा होता. जोसेफने २०२३ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४० धावांत ५ बळी घेतले होते.  तसेच, २०२२ मध्ये ब्रिस्टल येथे इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी न्गीडीने ३९ धावांत ५ बळी घेतले होते.

अर्शदीप सिंगने भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. २०२२ मध्ये पदार्पण करणाऱ्या या डावखुरा वेगवान गोलंदाजाने ७६ सामन्यांमध्ये ११८ बळी टिपले आहेत. अर्शदीप सिंगने  एका डावात ५ बळी घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. तथापि, या सामन्याच्या पहिल्या दोन षटकांमध्ये अर्शदीपने पहिल्या दोन षटकांमध्ये जवळजवळ ४० धावा मोजल्या होत्या.

A successful bowling outing and a five-wicket haul to savour 🙌 Congratulations Arshdeep Singh 👏👏 Updates ▶️ https://t.co/AwZfWUTBGi#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/J0lIIO6XXl — BCCI (@BCCI) January 31, 2026

कसा झाला सामना

मॅचबाबत, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून इशान किशनच्या पहिल्या टी-२० शतक आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या झंजवाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५ बाद २७१ धावांचा डोंगर उभा केला होता. किशनने ४३ चेंडूत १० षटकार आणि ६ चौकारांसह १०३ धावा कुटल्या. याशिवाय, कर्णधार सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ६३ धावा फटकावल्या, ज्यामध्ये ६ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. तर हार्दिक पंड्याने १७ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. त्याने ४ षटकार आणि १ चौकार लगावले.

हेही वाचा : Sports Budget 2026 : अर्थमंत्र्यांची क्रीडा क्षेत्रासाठी मोठी घोषणा! ‘खेलो इंडिया मिशन’ची करणार सुरुवात; वाचा सविस्तर

धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड संघाने फिन अॅलनच्या ३८ चेंडूत ६ षटकार आणि ८ चौकारांसह ८० धावांच्या जोरावर १९.४ षटकात २२५ धावाच करता आल्या. परिणामी सामना ४६ धावांनी गमावावा लागला. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ बळी घेतले, तर अक्षर पटेलने ३ बळी घेतले. वरुण चक्रवर्ती आणि रिंकू सिंग यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

Web Title: Ind vs nz 5th t20i despite taking 5 wickets arshdeep singh created an unwanted record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • IND vs NZ
  • T-20 Series

संबंधित बातम्या

IND Vs IRE Live: आयर्लंडला दुबळं समजणं पडलं महागात! ‘या’ फलंदाजांनी धू-धू धुतले, भारताला 183 रन्सची गरज
1

IND Vs IRE Live: आयर्लंडला दुबळं समजणं पडलं महागात! ‘या’ फलंदाजांनी धू-धू धुतले, भारताला 183 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.