Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ T20 Final: बुमराह विरुद्ध ॲलन की सॅमसन विरुद्ध हेन्री? अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूंमध्ये रंगणार चुरस; निर्णायक ठरेल लढत

टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर ठाकणार आहेत. बुमराहची गोलंदाजी की किवींची फटकेबाजी? जाणून घ्या कोणत्या खेळाडूंमधील टक्कर सामन्याचा निकाल ठरवेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 08, 2026 | 04:14 PM
अंतिम सामन्यात 'या' खेळाडूंमध्ये रंगणार चुरस (Photo Credit- X)

अंतिम सामन्यात 'या' खेळाडूंमध्ये रंगणार चुरस (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • बुमराह विरुद्ध ॲलन की सॅमसन विरुद्ध हेन्री?
  • अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूंमध्ये रंगणार चुरस
  • निर्णायक ठरेल लढत
India national cricket team vs New Zealand national cricket team: क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा (T20 World Cup 2026) अंतिम सामना आज अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) या दोन बलाढ्य संघांमध्ये होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाकडे सलग दुसरे आणि एकूण तिसरे विश्वविजेतेपद पटकावून इतिहास रचण्याची संधी आहे, तर न्यूझीलंडचा संघ आपले पहिलेवहिले टी-२० जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरेल.

सेमीफायनलमधील दिमाखदार कामगिरी

भारतीय संघाने मुंबईत पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करून दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, न्यूझीलंडने कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाडाव करत अंतिम फेरी गाठली. या दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने फायनलचा सामना अत्यंत रोमांचक होण्याची चिन्हे आहेत.

इतिहास बदलण्याचे भारतासमोर आव्हान

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड चौथ्यांदा आमनेसामने येत आहेत. एक रंजक आणि भारतासाठी काहीशी चिंतेची बाब म्हणजे, यापूर्वी झालेल्या तिन्ही विश्वचषक लढतींमध्ये न्यूझीलंडनेच बाजी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात केवळ विजेतेपदच नव्हे, तर ‘किवी’ संघाविरुद्धचा हा खराब रेकॉर्ड पुसून काढण्याचे मोठे आव्हान सूर्या सेनेसमोर असेल. तसेच दोन्ही संघामध्ये एकूण ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने १८ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे.

India vs New Zealand Final: आता पुरे झाले… सुनील गावस्कर अभिषेक शर्मावर संतापले! म्हणाले – “त्याला अंतिम सामन्यातून…”

अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूंमध्ये रंगणार चुरस

जसप्रीत बुमराह विरुद्ध किवी सलामीवीर: जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अचूक यॉर्कर आणि स्विंगचा सामना करणे फिन ॲलन आणि टिम सायफर्ट यांच्यासाठी कठीण परीक्षा असेल. सुरुवातीच्या षटकांत बुमराहला मिळणारे यश भारतासाठी निर्णायक ठरू शकते.

मॅट हेन्रीचा धोका: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री नेहमीच आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला आहे. त्याचा सामना संजू सॅमसन आणि युवा अभिषेक शर्मा यांना करावा लागेल. सॅमसन सध्या फॉर्ममध्ये असला तरी अभिषेकला मोठी खेळी करून स्वतःला सिद्ध करावे लागेल.

स्पिनर्सची भूमिका: अहमदाबादची खेळपट्टी संथ आणि मोठी असल्याने मिचेल सँटनर आणि रचिन रवींद्र हे फिरकीपटू महत्त्वाचे ठरतील. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यासाठी सँटनरचे आव्हान असेल, तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांची आक्रमक फलंदाजी किवी फिरकीपटूंवर दबाव निर्माण करू शकते.

IND vs NZ : वरुण चक्रवर्तीला अंतिम प्लेइंग इलेव्हनमधून वगळणार? कर्णधार सूर्यकुमार यादवने इरादे केले स्पष्ट

Web Title: Ind vs nz the final match will be between these players the match will be decisive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Jasprit Bumrah
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

India vs New Zealand Final: आता पुरे झाले… सुनील गावस्कर अभिषेक शर्मावर संतापले! म्हणाले – “त्याला अंतिम सामन्यातून…”
1

India vs New Zealand Final: आता पुरे झाले… सुनील गावस्कर अभिषेक शर्मावर संतापले! म्हणाले – “त्याला अंतिम सामन्यातून…”

IND vs NZ : वरुण चक्रवर्तीला अंतिम प्लेइंग इलेव्हनमधून वगळणार? कर्णधार सूर्यकुमार यादवने इरादे केले स्पष्ट
2

IND vs NZ : वरुण चक्रवर्तीला अंतिम प्लेइंग इलेव्हनमधून वगळणार? कर्णधार सूर्यकुमार यादवने इरादे केले स्पष्ट

Quinton de Kock चा राग अनावर! विश्वचषक फायनलपूर्वी आयसीसीवर केली टीका, नक्की झाले काय? वाचा सविस्तर प्रकरण
3

Quinton de Kock चा राग अनावर! विश्वचषक फायनलपूर्वी आयसीसीवर केली टीका, नक्की झाले काय? वाचा सविस्तर प्रकरण

IND vs NZ : ‘सभी एक ही लाइन चिपका रहे’ अंतिम सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरू, सूर्यकुमार यादवने सँटनरवर केली  टीका
4

IND vs NZ : ‘सभी एक ही लाइन चिपका रहे’ अंतिम सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरू, सूर्यकुमार यादवने सँटनरवर केली टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.