• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ind Vs Pak Cricket Controversies Top 6

अख्तर, गंभीर, हरभजन आणि आफ्रिदी…; IND vs PAK सामन्यापूर्वी मैदानातील ‘या’ 6 मोठ्या वादांची चर्चा; वाचा सविस्तर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांमधील 6 मोठ्या वादांवर एक नजर टाकूया, ज्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरील शत्रुत्व आणखी वाढले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 12, 2025 | 09:54 PM
अख्तर, गंभीर, हरभजन आणि आफ्रिदी…; IND vs PAK सामन्यापूर्वी मैदानातील ‘या’ 6 मोठ्या वादांची चर्चा; वाचा सविस्तर

IND vs PAK (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये
  • अख्तर, गंभीर, हरभजन आणि आफ्रिदी…;
  • IND vs PAK सामन्यापूर्वी मैदानातील ‘या’ 6 मोठ्या वादांची चर्चा

IND vs PAK: आशिया कप 2025 स्पर्धेतील (Asia Cup 2025) सर्वात मोठा महामुकाबला रविवार, 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान  यांच्यात दुबईमध्ये खेळवला जाईल. हा रोमांचक सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू होईल. आशिया कपच्या टी-20 फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी आतापर्यंत तीन वेळा एकमेकांचा सामना केला आहे. त्यापैकी दोन सामन्यांत भारताने, तर एका सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आहे. तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या एकूण 13 टी-20 सामन्यांमध्ये भारताने 10 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. या विक्रमांमुळे सामन्याची उत्कंठा आणखी वाढली आहे.

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंच्या कामगिरीपेक्षाही दोन्ही देशांतील खेळाडूंमधील वाद अधिक चर्चेत राहिले आहेत. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमधील ६ मोठ्या वादांवर एक नजर टाकूया:

1. कामरान अकमल विरुद्ध गौतम गंभीर

2010 च्या एशिया कपमध्ये पाकिस्तानचा यष्टिरक्षक कामरान अकमलने फलंदाजी करत असलेल्या गौतम गंभीरला उगाचच अपील करून त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. अखेर एमएस धोनीला मध्यस्थी करून हा वाद शांत करावा लागला.

2. विरेंद्र सेहवाग विरुद्ध शोएब अख्तर

2003 च्या एका सामन्यात शोएब अख्तर विरेंद्र सेहवागला एकामागून एक बाऊन्सर टाकत होता, जेणेकरून तो लवकर बाद होईल. शोएबच्या या कृत्याला कंटाळून सेहवाग त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “हिंमत असेल तर नॉन स्ट्रायकर एंडवरील सचिनला बाऊन्सर टाक.” त्यानंतर सचिनने शोएबच्या बाऊन्सरवर षटकार मारला, तेव्हा सेहवागने ‘बाप बाप होता है और बेटा बेटा होता है’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

3. हरभजन सिंग विरुद्ध शोएब अख्तर

2010 च्या एशिया कपमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या 7 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज होती. शोएब अख्तरने हरभजन सिंगला त्रास देणारा चेंडू टाकून त्याला चिथावले. यावरून दोघांमध्ये मैदानावरच जोरदार वाद सुरू झाला. यानंतर, हरभजन सिंगने आमिरच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला आणि अख्तरला आपल्या आक्रमक शैलीत उत्तर दिले.

हे देखील वाचा: Asia cup 2025 : ‘…म्हणूनच पाकिस्तान भारताकडून हरतो’, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा संघाला घरचा आहेर

4. गौतम गंभीर विरुद्ध शाहिद आफ्रिदी

2007 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर असताना, कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. आफ्रिदीच्या चेंडूवर धाव घेताना गंभीर आणि आफ्रिदीची टक्कर झाली. गंभीरला वाटले की आफ्रिदीने मुद्दाम असे केले, त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.

5. राहुल द्रविड विरुद्ध शोएब अख्तर

2004 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बर्मिंगहॅममध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान राहुल द्रविड शोएब अख्तरशी भिडला होता. द्रविड धाव घेत असताना अख्तर त्याच्या मार्गात उभा राहिला, त्यामुळे द्रविड त्याला धडकला. यावर संतापलेल्या द्रविडने अख्तरला धाव घेण्याच्या मार्गातून बाजूला होण्यास सांगितले. यावर अख्तरलाही राग आला. हा वाद वाढताना पाहून पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम-उल-हक आणि पंचांनी हस्तक्षेप करून दोघांना शांत केले.

6. शाहिद आफ्रिदीने धोनीला दिली होती शिवीगाळ

2005 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर असताना, विशाखापट्टणम येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शाहिद आफ्रिदीने महेंद्रसिंग धोनीला शिवीगाळ केली होती. त्यावेळी धोनीच्या कारकिर्दीतील तो पाचवाच सामना होता. धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १२३ चेंडूत १४८ धावा केल्या होत्या, जे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक होते. धोनीला विचलित करण्याच्या उद्देशाने आफ्रिदीने फेक अपील करून त्याला शिवीगाळ केली. यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता धोनीने पुढच्याच चेंडूवर षटकार मारून आफ्रिदीचे तोंड बंद केले.

Web Title: Ind vs pak cricket controversies top 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • IND VS PAK
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

Pakistan vs Oman : पाकिस्तानचे ओमानसमोर 160 धावांचे लक्ष्य; आगा आर्मीला नवख्या गोलंदाजांनी रडवले
1

Pakistan vs Oman : पाकिस्तानचे ओमानसमोर 160 धावांचे लक्ष्य; आगा आर्मीला नवख्या गोलंदाजांनी रडवले

Asia cup 2025 : ‘…म्हणूनच पाकिस्तान भारताकडून हरतो’, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा संघाला घरचा आहेर
2

Asia cup 2025 : ‘…म्हणूनच पाकिस्तान भारताकडून हरतो’, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा संघाला घरचा आहेर

Pakistan vs Oman : पाकिस्तानने Toss जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; ओमान पदर्पणात दाखवणार दम? 
3

Pakistan vs Oman : पाकिस्तानने Toss जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; ओमान पदर्पणात दाखवणार दम? 

IND-PAK सामन्याला माजी क्रिकेटपटूचा जोरदार सपोर्ट! म्हणाला.,”या सामन्याला राजकारणापासून दूर.. 
4

IND-PAK सामन्याला माजी क्रिकेटपटूचा जोरदार सपोर्ट! म्हणाला.,”या सामन्याला राजकारणापासून दूर.. 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अख्तर, गंभीर, हरभजन आणि आफ्रिदी…; IND vs PAK सामन्यापूर्वी मैदानातील ‘या’ 6 मोठ्या वादांची चर्चा; वाचा सविस्तर

अख्तर, गंभीर, हरभजन आणि आफ्रिदी…; IND vs PAK सामन्यापूर्वी मैदानातील ‘या’ 6 मोठ्या वादांची चर्चा; वाचा सविस्तर

दिलासादायक! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधितांना ७३ कोटी ९१ लाखांची मदत; राज्य शासनाची मान्यता

दिलासादायक! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधितांना ७३ कोटी ९१ लाखांची मदत; राज्य शासनाची मान्यता

Oben Electric द्वारे ‘मेगा फेस्टिव्ह उत्सव’ची घोषणा, ग्राहकांना मिळणार अफलातून फायदे

Oben Electric द्वारे ‘मेगा फेस्टिव्ह उत्सव’ची घोषणा, ग्राहकांना मिळणार अफलातून फायदे

Disha Patani: बॉलीवूड हादरलं! अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गॅंगस्टर्सनी घेतली जबाबदारी

Disha Patani: बॉलीवूड हादरलं! अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गॅंगस्टर्सनी घेतली जबाबदारी

Duleep Trophy Final 2025: पाटीदार-राठोड जोडीच्या शतकासमोर दक्षिण झोनचे गोलंदाज निष्प्रभ; मध्य झोनकडे 235 धावांची आघाडी

Duleep Trophy Final 2025: पाटीदार-राठोड जोडीच्या शतकासमोर दक्षिण झोनचे गोलंदाज निष्प्रभ; मध्य झोनकडे 235 धावांची आघाडी

ठरलं तर! सुशीला कार्कींच्या हाती नेपाळची सूत्रे; आज रात्री घेणार अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ

ठरलं तर! सुशीला कार्कींच्या हाती नेपाळची सूत्रे; आज रात्री घेणार अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ

सोने सोडा, आता प्लॅटिनमची चलती! ऑल-टाइम हायवर पोहोचलेल्या दरांनी तरुणाईला घातली भुरळ

सोने सोडा, आता प्लॅटिनमची चलती! ऑल-टाइम हायवर पोहोचलेल्या दरांनी तरुणाईला घातली भुरळ

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच

Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच

Nashik News : 40 किमी प्रवासाला दोन तास, रस्ता चौपदरीकरणाची गरज अधोरेखित

Nashik News : 40 किमी प्रवासाला दोन तास, रस्ता चौपदरीकरणाची गरज अधोरेखित

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकले

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकले

Parbhani Crime : परभणीत बालिकेवर अत्याचार प्रकरणी बंजारा समाजात उद्रेक

Parbhani Crime : परभणीत बालिकेवर अत्याचार प्रकरणी बंजारा समाजात उद्रेक

Kolhapur : कोल्हापूरात कुणबी नोंदीतील चुका उघड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप

Kolhapur : कोल्हापूरात कुणबी नोंदीतील चुका उघड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप

Navi Mumbai :  मनपा अधिकारी सत्ताधाऱ्यांना हवी तशीच प्रभाग रचना करत आहेत, मनसेचा आरोप

Navi Mumbai : मनपा अधिकारी सत्ताधाऱ्यांना हवी तशीच प्रभाग रचना करत आहेत, मनसेचा आरोप

Solapur : महापालिका आयुक्तांचा गुडघाभर पाण्यात उभं राहून बाधित भागांना दौरा

Solapur : महापालिका आयुक्तांचा गुडघाभर पाण्यात उभं राहून बाधित भागांना दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.