सलमान अली आगा(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप २०२५ स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने खेळवण्यात आले आहेत. आज १२ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि ओमान या दोन संघात सामना खेळला जात आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाने यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद हरीसने केलेल्या ६६ धावांच्या जोरावर ७ विकेट गमावून धावा १६० केल्या आहेत. आता ओमानला हा सामना जिंकण्यासाठी १६१ धावा कराव्या लागणार आहेत. पाकिस्तानकडून हारिसने सर्वाधिक ६६ धावा केल्या आहेत. ओमानकडून आमिर कलीमने शानदार गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या आहेत.
पाकिस्तानचा डाव
सामन्यापूर्वी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. परंतु, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आली आगाचा हा निर्णय चांगलाच अंगाशी आल्याचे दिसून आले. पाकिस्तानचा सालामीवीर सैम अयुब भोपळाही न फोडता माघारी परतला. त्याला आमीर कलीमने बाद केले. त्यानंतर सलामीवीर साहिबजादा फरहान आणि मोहम्मद हरीस यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांमध्ये ८५ धावांची भागीदारी झाली. यानंतर साहिबजादा फरहान २९ धावा करून शाह फैसलचा बळी ठरला.
त्यानंतर मोहम्मद हरीस वगळता पाकिस्तानच्या इतर फलंदाज जास्त खास काही करू शकले नाहीत. मोहम्मद हरीस आपले अर्धशतक करून माघारी परतला. त्याने ४३ चेंडूचा सामना करत ६६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याला कलीमने बाद केले. मोहम्मद हरीसनंतर मैदानात त्यानंतर आलेला पाकिस्तानचा कर्णधार तर शून्यावर बाद झाला. त्याला कलीमने आपली शिकार बनवले. त्यानंतर हसन नवाज ९,मोहम्मद नवाज १९, तर फकर जमान २३ धावा शाहीन २ धावा करून नाबाद राहिले. ओमानकडून आमिर कलीम आणि शाह फैसल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, नदीमने १ विकेट घेतली तरी इतर गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.
हेही वाचा : Plane Emergency Landing : क्रिकेटचा देव तेंडुलकरच्या विमानाची आपत्कालीन लॅंडींग! पहा जंगलातील थरारक व्हिडिओ
दोन्ही संघांचे अंतिम ११ खेळाडू खालीलप्रमाणे
ओमान : जतिंदर सिंग (कर्णधार), आमिर कलीम, हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (यष्टीरक्षक), शाह फैसल, हसनैन शाह, मोहम्मद नदीम, झिकारिया इस्लाम, सुफियान महमूद, शकील अहमद, समय श्रीवास्तव.
पाकिस्तानः सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरीस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद.
बातमी अपडेट होत आहे…