रजत पाटीदार आणि यश राठोड(फोटो-सोशल मीडिया)
Central Zone vs South Zone : बीसीसीआयने आयोजित केलेल्या दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये मध्य विभागा आणि दक्षिण विभाग यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्यात मध्य विभागाने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर मध्य विभागाने दक्षिण विभागावर २३५ धावांची आघाडी मिळवली आहे. मध्य विभागासाठी अंतिम सामन्यात रजत पाटीदार आणि यश राठोड यांनी शतकं झळकावली आहेत.
बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे हा अंतिम सामना खेळला जात आहे. अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात केवळ १४९ धावांवर सर्वबाद झाला. तर दुसरीकडे, दुसऱ्या दिवसानंतर मध्य विभागाने ५ गडी गमावून ३८४ धावा उभारल्या आहेत. यासह आता मध्य विभागाने २३५ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘…म्हणूनच पाकिस्तान भारताकडून हरतो’, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा संघाला घरचा आहेर
मध्य विभागाचे दोन फलंदाज रजत पाटीदार आणि यश राठोड यांनी एकामागून एक शतक झळकावून दक्षिण विभागावर आपली पकड अधिक मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. सेंट्रल झोनचा कर्णधार रजत पाटीदारने ११२ चेंडूत शतक झळकावले. यासह, प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पाटीदारचे हे १५ वे शतक ठरले आहे. शतक ठोकल्यानंतर पाटीदार माघारी परतला. झाला. पाटीदारने ११५ चेंडूंचा सामना करत १०१ धावांची खेळी साकारली ज्यामध्ये त्याने १२ चौकार आणि २ षटकार ठोकले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यश राठोडने देखील दक्षिण विभागाला शतकी तडाखा दिला. राठोड १३७ धावा करून खेळत आहे. या दरम्यान यश राठोडने १८८ चेंडूंचा सामना केला. या खेळीत त्याने ११ चौकार आणि एक षटकार खेचला. यश राठोड आणि रजत पाटीदार यांच्यात १६७ धावांची मोठी भागीदारी देखील झाली.
हेही वाचा : Plane Emergency Landing : क्रिकेटचा देव तेंडुलकरच्या विमानाची आपत्कालीन लॅंडींग! पहा जंगलातील थरारक व्हिडिओ
मध्य विभागाने ५० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. तेव्हा दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला अक्षय वाडकर २२ धावा करून माघारी परतला तर शुभमन शर्माही ६ धावा काढून झटपट बाद झाला. दानिश मालेवार अर्धशतकी खेळी करून पॅव्हेलीयनकडवे परतला. त्याने ५३ धावांची खेळी केली. त्यानंतर रजत पाटीदार आणि यश राठोड यांनी संघाची सूत्रे हाती घेतली आणि संघाला मोठी आघाडी उभारून दिली. रजत पाटीदार १०१ धावा काढून बाद झाला. तर यश राठोड १३७ धावा काढून खेळत आहे. तसेच त्याच्यासोबत सरांश जैन ४७ धावा काढून नाबाद आहे.