Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs SA 2nd Test : भारतासाठी 30 वे कसोटी स्थळ निश्चित! पंत आणि बावुमा या दोन कर्णधारांकडून सामन्याचे उद्घाटन

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना २२ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हे स्टेडियम भारताचे ३० वे कसोटी स्थळ बनले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 22, 2025 | 07:50 PM
Ind vs SA 2nd Test: 30th Test venue confirmed for India! Pant and Bavuma to open the match

Ind vs SA 2nd Test: 30th Test venue confirmed for India! Pant and Bavuma to open the match

Follow Us
Close
Follow Us:
  • गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियम भारताचे ३० वे कसोटी स्थळ
  • कर्णधार पंत आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमा यांची समारंभाला हजेरी 
  • पहिल्या दिवसाचा खेळाअखेर दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर २४७/६
Ind vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २२ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हे स्टेडियम भारताचे ३० वे कसोटी स्थळ ठरले आहे. ईशान्येकडील क्षेत्रासाठी क्रिकेट इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. ज्यामुळे आता भारतीय संघावर बरोबरी साधण्याचा दबाव निर्माण झाला असून हा सामना जिंकणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Ind vs SA Test : गौतम गंभीरच्या प्रयोगांचे भारतीय संघाला अपचन! दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले गेले ‘सात’ फलंदाज

ऋषभ पंतकडे पहिल्यांदाच कर्णधारपदाची धुरा

या सामन्यातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे ऋषभ पंतचा कर्णधार म्हणून मैदानात प्रवेश. शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे बाहेर पडला, ज्यामुळे पंतला संघाची जबाबदारी स्वीकारावी लागली. हा प्रसंग त्याच्यासाठी खास होता, कारण तो पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून घरच्या प्रेक्षकांसमोर खेळला होता. सामन्यापूर्वीच्या अधिकृत फोटोशूट आणि औपचारिकता या ऐतिहासिक क्षणाला आणखी खास बनवतात.

दोन्ही कर्णधारांची संस्मरणीय समारंभाला उपस्थिती

दूसरा सामना सुरू होण्यापूर्वी, भारतीय कर्णधार ऋषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा यांनी एसीए स्टेडियममध्ये एका संस्मरणीय फोटोवर स्वाक्षरी केली. यावेळी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी देखील समारंभाला उपस्थिती लावली आणि दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीसाठी एक विशेष स्मारक सोन्याचे नाणे भेट देण्यात आले आहे. गुवाहाटीमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याची आठवण म्हणून हे नाणे कायमचे जपले जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाकडून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. खेळपट्टी लवकर फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने त्याने ही रणनीती अवलंबवण्यात आली. भारताकडून या सामन्यासाठी संघामध्ये बदल केले, ज्यामध्ये संघाला नवीन जोम देण्यासाठी युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डी आणि साई सुदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : AUS vs ENG : Ashes 2025 मध्ये ट्रॅव्हिस हेडचा धुमाकूळ! फक्त 69 चेंडूत धमाकेदार शतक ठोकत रचला इतिहास

पहिल्या दिवसाचा खेळाअखेर दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर २४७/६

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसरा कसोटी सामना गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २४७ धावां केल्या होत्या. मुथुस्वामी २५ आणि व्हर्नन १ धावांवर नाबाद राहिले. भारताकडून फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक तीन बळी घेतले.

Web Title: Ind vs sa 2nd test inauguration of 30th test venue guwahati in presence of pant and bavuma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • Guvahati
  • IND vs SA Test
  • Rishabh Pant
  • Temba Bavuma

संबंधित बातम्या

Ind vs SA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त! दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 247/6, कुलदीपची शानदार गोलंदाजी
1

Ind vs SA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त! दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 247/6, कुलदीपची शानदार गोलंदाजी

Ind vs SA 2nd Test: KL Rahul ची ‘ती’ चूक अन् बुमराह नि:शब्द! पंत आर्मीला सोसावे लागले मोठे नुकसान
2

Ind vs SA 2nd Test: KL Rahul ची ‘ती’ चूक अन् बुमराह नि:शब्द! पंत आर्मीला सोसावे लागले मोठे नुकसान

IND vs SA : पहिल्या सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेची पकड…भारतीय गोलंदाजांच्या हाती लागली एक विकेट
3

IND vs SA : पहिल्या सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेची पकड…भारतीय गोलंदाजांच्या हाती लागली एक विकेट

IND vs SA : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दुपारच्या जेवणापूर्वी चहापानाचा ब्रेक, सामन्यांच्या वेळेतही करण्यात आला बदल
4

IND vs SA : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दुपारच्या जेवणापूर्वी चहापानाचा ब्रेक, सामन्यांच्या वेळेतही करण्यात आला बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.