ट्रॅव्हिस हेड(फोटो-सोशल मीडिया)
Travis Head hits century in Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात २०२५-२६ अॅशेसची मालिका सुरू आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८ विकेट्सने विजय मिळवला. या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कांगारू फलंदाज ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकवून इतिहास घडवला आहे. या शतकाने सामन्याचा वेगच बदलला नाही तर अॅशेसच्या विक्रमी पुस्तकात एक नवीन बेंचमार्कही प्रस्थापित करून संघाला विजय मिळवून दिला आहे.
इंग्लंड संघाने २०५ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना, ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या डावात सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला. त्याने केवळ ६९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि अॅशेसच्या इतिहासात दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. या कामगिरीसह, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना शतक ठोकणारा सर्वात जलद फलंदाज बनला आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी १९ बळी टिपले गेले. तरी दुसऱ्या दिवशीही गोलंदाजांनी आपले वर्चस्व कायम राखण्यात यश राखले. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात १३२ धावांतच गारद झाली. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड दुसऱ्या डावात फक्त १६४ धावाच उभारू शकला. चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेडला डावाची सुरुवात मैदानात उतरलला आणि त्याने विरोधी गोलंदाजांवर हल्ला चढवला. हेडने वादळासारखी फलंदाजी करत शतक ठोकले हेडने १९०२ मध्ये ७६ चेंडूत शतक करणाऱ्या गिल्बर्ट जेसॉपचा विक्रम मोडीत काढला. २००६-०७ मध्ये पर्थमध्ये ५७ चेंडूत शतक करणारा अॅडम गिलख्रिस्टच्या या यादीत अव्वल स्थानावर आहे.
ट्रॅव्हिस हेडने पहिल्या सामन्यातील चौथ्या डावात शानदार फलंदाजी डोळ्याचे पारणे फेडणारी अशीच होती. त्याने डेव्हिड वॉर्नरच्या संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जलद ऑस्ट्रेलियन कसोटी शतकाच्या विक्रमाशी बरोबरी साधली. त्याने फक्त ६९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यासोबत, हेडने त्याच्या ४,००० कसोटी धावा देखील पूर्ण केल्या. हे त्याच्या कारकिर्दीतील त्याचे १० वे कसोटी शतक ठरले.
हेही वाचा : Ind vs SA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त! दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 247/6, कुलदीपची शानदार गोलंदाजी
इंग्लंडने दिलेल्या २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरेलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात छान झाली. ट्रॅव्हिस हेडने वेदरलेडसह पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची भक्कम भागीदारी केली. वेदरलेड २३ धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात लबुशेनने आला. लबुशेन आणि हेड या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ चेंडूत ११७ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.






