गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
7 batsmen played at number 3 in the Indian team : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात दोन सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाहिला सामना कोलकाता येथील इडन गार्डन्सवर खेळवण्यात आला होता. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताला ३० धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर कसोटी संघाच्या कामगिरीबाबत मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. गंभीर यांच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात भारताने टी२० आणि वनडेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असली, तरी कसोटी क्रिकेटमध्ये मात्र संघाची घसरण स्पष्टपणे जाणवत आहे.
गंभीरच्या नेतृत्वाखाली गेल्या १२-१३ महिन्यांत भारताने घरच्या मैदानावर तब्बल चार कसोटी सामने गमावले आहेत. एकेकाळी घरच्या अटींवर अभेद्य मानला जाणारा भारतीय संघ आता सातत्य गमावतोय, आणि यामागील मुख्य कारण म्हणून क्रमांक-३वरील अस्थिरता पुढे येत आहे.
हेही वाचा : AUS vs ENG : Ashes 2025 मध्ये ट्रॅव्हिस हेडचा धुमाकूळ! फक्त 69 चेंडूत धमाकेदार शतक ठोकत रचला इतिहास
गेल्या दीड वर्षांत भारताने तिसऱ्या क्रमांकासाठी सात वेगवेगळ्या फलंदाजांची परीक्षा घेतली आहे. गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून शुभमन गिलने ही भूमिका सांभाळली; परंतु नंतर कर्णधार झाल्यानंतर तो चौथ्या क्रमांकावर गेला. त्यानंतर केएल राहुल, विराट कोहली, देवदत्त पडिकल, करुण नायर, सुदर्शन आणि आता वॉशिंग्टन सुंदर यांना या महत्त्वाच्या स्थानावर उतरवण्यात आले.
कसोटी क्रिकेटमध्ये क्रमांक-३चा फलंदाज संघाचा कणा मानला जातो. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, नंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी वर्षानुवर्षे या क्रमांकावर स्थिरता दिली. परंतु पुजाराला वगळल्यानंतर भारतीय संघाला योग्य पर्याय मिळालेला नाही. या स्थानावर ठोस निर्णय न घेतल्यास, भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे तिकीट [ मिळवताना अडचणी येऊ शकतात.
हेही वाचा : Ind vs SA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त! दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 247/6, कुलदीपची शानदार गोलंदाजी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला असून दूसरा सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर ६ बाद २४७ होता. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या देवशी ने धावा केल्या तर भारताकडून कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या.






