Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 2nd T20 : अरे रे! अर्शदीप हे काय करून बसला! एका T20 सामन्यात टाकली 13 चेंडूंची ओव्हर; लज्जास्पद विक्रम केला नावे 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी २०  क्रिकेटमध्ये १३ चेंडूंचे षटक टाकले आणि  लाजिवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 11, 2025 | 09:47 PM
IND vs SA 2nd T20: Oh my! What did Arshdeep do! He bowled 13 overs in a T20 match; He made a shameful record

IND vs SA 2nd T20: Oh my! What did Arshdeep do! He bowled 13 overs in a T20 match; He made a shameful record

Follow Us
Close
Follow Us:

IND vs SA 2nd T20, Arshdeep Singh’s shameful record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दूसरा टी २०  सामना खेळला जात आहे. टॉस गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २१४  धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज  अर्शदीप सिंगने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याने टी २०  क्रिकेटमध्ये १३ चेंडूंचे षटक टाकले आणि  लाजिवाणा विक्रम रचला आहे.

हेही वाचा : IND vs SA 2nd T20 : ‘मिस्टर 360’ होणार रो-कोच्या ‘त्या’ खास क्लबमध्ये सामील! एबी डिव्हिलियर्सचाही विक्रम मोडण्याची असेल संधी

अर्शदीपच्या नावे नलज्जास्पद विक्रम

अर्शदीपने एका ओव्हरमध्ये  ७ चेंडू वाईड टाकले. या कामगिरीसह, तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १३ चेंडूंचे षटक टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये हा विक्रम अत्यंत दुर्मिळ असून एका गोलंदाजासाठी तो अत्यंत लज्जास्पद मानला जातो. अर्शदीपच्या या षटकाने चाहते आणि तज्ञ दोघांना देखील आश्चर्यचकित केले आहे.

जागतिक विक्रमाशी साधली  बरोबरी

अर्शदीप सिंग आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १३ चेंडूंचे षटक टाकणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. ज्यामध्ये ६ कायदेशीर चेंडू आणि ७ वाईडचा समावेश होता. यापूर्वी, हा विक्रम अफगाणिस्तानच्या नवीन उल हकच्या नवे जमा होता.  ज्याने गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध १३ चेंडूंचे षटक टाकले होते, ज्यामध्ये ६ वाईड आणि १ नो-बॉल होता.

पूर्ण सदस्य संघातील इतर कोणत्याही गोलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इतका लांब ओव्हर टाकली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या सिसंदा मगालाने २०२१ मध्ये जोहान्सबर्गमध्ये पाकिस्तानविरुद्ध १२ चेंडूंची ओव्हर टाकली होती.. तथापि, अर्शदीप सिंगने मगालाला मागे टाकत नवीन उल हकच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. अर्शदीप सिंगची ही ओव्हर त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी जरी ठरली असली तरी  चाहते आणि विश्लेषक टी-२० क्रिकेटमध्ये ही एक दुर्मिळ घटना असल्याचे मानत आहेत.

हेही वाचा : फुटबॉल मैदानाला दंगलीचे रूप! बघता बघता पाकिस्तानी खेळाडूंमध्ये तूफान हाणामारी; पहा Video

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्या दोन षटकांमध्ये २० धावा मोजल्या. ड्रिंक्स ब्रेकनंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला गोलंदाजीसाठी पुन्हा पाचारण केले. अर्शदीपने ११ व्या षटकात १८ धावा दिल्या, ज्यात त्याने सात वाईड टाकले होते. यात एक षटकार, तीन एकेरी आणि एक दुहेरी धावांचा समावेश होता.

दक्षिण आफ्रिकेच्या २१३ धावा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या  T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात  नाणेफक गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत क्विंटन डी कॉकच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर ४ बाद २१३ धावा केल्या आहेत. क्विंटन डी कॉकने ४६ चेंडूचा सामना करत ९० धावांची खेळी केली. त्याने या खेळीत ५ चौकार आणि ७ षटकार ठोकले. भारताला विजयासाठी २१४ धावा कराव्या लागणार आहेत.

Web Title: Ind vs sa arshdeep singh bowls 13 balls in an over in a t20 match sets an embarrassing record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • Ind Vs Sa
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND VS NZ 2nd T20l : ‘मी रोहित शर्माच्या पावलावर पाऊल…’, भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माचे मोठे विधान 
1

IND VS NZ 2nd T20l : ‘मी रोहित शर्माच्या पावलावर पाऊल…’, भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माचे मोठे विधान 

IND VS NZ 2nd T20 : पत्नीच्या सल्ल्याने पालटला दिवस! 23 डावांनंतर फॉर्ममध्ये परतलेल्या कर्णधाराने केला खुलासा; पहा VIDEO
2

IND VS NZ 2nd T20 : पत्नीच्या सल्ल्याने पालटला दिवस! 23 डावांनंतर फॉर्ममध्ये परतलेल्या कर्णधाराने केला खुलासा; पहा VIDEO

IND VS NZ 2nd T20l Match : टी२० मध्ये भारताने पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला! धावांचा पाठलाग करताना केला ‘हा’ पराक्रम 
3

IND VS NZ 2nd T20l Match : टी२० मध्ये भारताने पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला! धावांचा पाठलाग करताना केला ‘हा’ पराक्रम 

DC vs RCB, WPL 2026: आज दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई! RCB चे असणार मोठे आव्हान
4

DC vs RCB, WPL 2026: आज दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई! RCB चे असणार मोठे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.