फुटबॉल स्टेडियम प्रतीकात्मक(फोटो-सोशल मीडिया)
Riot at football stadium in Pakistan : जगात फुटबॉल हा खेळ स्रवत जास्त लोकप्रिय असणारा खेळ. परंतु, या खेळादरम्यान बऱ्याच वेळा हिंसाचार देखील बघायला मिळतो. अशातच आता, पाकिस्तानमध्ये एका सामन्याने हिंसाचाराची पातळी ओलांडलेली दिसून आली. कराचीमधील राष्ट्रीय खेळांदरम्यान, फुटबॉल सामन्यानंतर लगेचच दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांवर हल्ला केला. मैदानावरच खेळाडूंमध्ये हाणामारी झाली.
पाकिस्तानमध्ये ही घटना कराचीमधील केपीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. जिथे पाकिस्तानी सैन्य आणि वापडा संघ आमनेसामने आले होते. अंतिम शिट्टी वाजताच दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी भिडलेले दिसून आले. मैदानात चांगलाच गोंधळ उडाला, खेळाडू आणि काही अधिकाऱ्यांवर देखील हल्ला झाला. या हाणामारीत अनेक खेळाडू आणि अधिकारी जखमी झाले आहेत. तथापि, दुखापती किती गंभीर होत्या आणि या वादात किती लोक सामील होते याबाबत यद्यप काही एक स्पष्टता नाही.
या घतेनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही घटना लाईव्ह टेलिव्हिजन कॅमेऱ्यांसमोर घडली आहे. या वादाचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. ही घटना बघितल्यानंतर पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन आणि देशाची राष्ट्रीय ऑलिंपिक संस्था सक्रिय झाल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही संघटनांनी या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू केली असून दोन्ही संघांकडून जबाबदारी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. व्हिडिओनंतर, क्रीडा चाहत्यांनी या घटनेवर चांगलीच नाराजी व्यक्त केली तसेच जोरदार टीका देखील केली आहे.
PHADAAAAAAA! Army beats Wapda 4-3 after a nail-biting match to qualify for the final of National Games but a fight broke out between the two teams after the final whistle. The lyari crowd loved it! 😅😅#PakistanFootball pic.twitter.com/EABpJM6vWN — Muneeb Farrukh (@Muneeb313_) December 10, 2025
व्हायरल व्हिडिओमध्ये काही वापडा खेळाडू जास्त आक्रमक दिसून आले. वृत्तानुसार, ते मॅच रेफरीच्या मागे त्यांच्या चेंजिंग रूममध्ये देखील गेले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. सुदैवाने, इतर अधिकारी आणि खेळाडूंनी वेळीच हस्तक्षेप केल्याने रेफरीला सुरक्षित ठिकाणी नेता आले.
या हिंसाचार घडण्यामागे मुख्य कारण म्हणजे सामन्यादरम्यान रेफरीने आर्मी संघाच्या बाजूने दिलेला दंड असल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे वापडाच्या खेळाडूंचा राग अनावर झाला आणि त्यांनी सामना संपताच त्यांचा राग हिंसाचारा बदलला. या लाजिरवाण्या घटनेमुळे पाकिस्तानी फुटबॉलमधील क्रीडाभावनेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.






