सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA 2nd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसराय सामना आज खेळला. कटकमधील पहिल्या सामन्यात भारताने १०१ धावांनी विजय मिळवला होता. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आता मुल्लानपूरमधील दुसऱ्या सामन्यात देखील पुन्हा एकदा भारत दमदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला विक्रम रचण्याची संधी असणार आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी दुसरा टी२० सामना खास असणार आहे. पहिल्या सामन्यात त्याला कामगिरी करता आलेली नाही. तो फक्त १२ धावा करू शकल होता. गेल्या वर्षी सूर्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याचे शेवटचे अर्धशतक ऑक्टोबर २०२४ मध्ये हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध आले होते. त्यामुळे, संघ आणि चाहत्यांना आशा आहे की तो मुल्लानपूरमध्ये धावा करेल आणि संघाला एक दमदार सुरुवात करून देईल.
या सामन्यात सूर्याला एक मोठी कामगिरी खुणावत आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ येऊन पोहचला आहे. हा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त ४७ धावांची आवश्यकता आहे. सध्या, त्याच्याच्या खात्यावर टी-२० क्रिकेटमध्ये ३४३ सामन्यांपैकी ३१७ डावांमध्ये ८९५३ धावा जमा आहेत. जर त्याने हा टप्पा गाठला तर तो ९००० धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरणार आहे, याआधी विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ही किमया साधली आहे.
हेही वाचा : ‘मी रिस्क घेईन, तू खेळत रहा…” स्वत:चे करियर धोक्यात घालणाऱ्या रोहित शर्माबद्दल यशस्वी जयस्वालचा मोठा खुलासा






