Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’! जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?

IND vs SL 1st Test Probable Playing 11: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यला उद्यापासून सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 14, 2026 | 05:03 PM
IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’!  जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?
Follow Us
Follow Us:
  • कर्णधार गिलसमोर Playing XIचा पेच
  • जागा 2 अन् दावेदार 4,
  • कोणाला मिळणार संधी?
भारत आणि श्रीलंका (IND vs SL 1st Test) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना शनिवारी १५ ऑगस्ट रोजी गॉल येथे, तर दुसरा कसोटी सामना २३ ऑगस्ट रोजी कोलंबो येथे खेळवला जाईल. गॉल कसोटी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सुरू होईल. पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांसमोर एक कठीण आव्हान असेल, कारण गॉलचे मैदान फिरकीसाठी ओळखले जाते. अलीकडे भारतीय फलंदाजांना क्रिकेटच्या सर्वात लांब प्रकारात फिरकी खेळताना संघर्ष करावा लागत आहे. यापूर्वी मायदेशात फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारताला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्लीन स्वीपचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे, हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

Cricket News: दावणगिरी एक्सप्रेस सुसाट! कर्णधार म्हणून कमाल, आता कोच म्हणून धमाल; Vinay Kumar कर्नाटकच्या मुख्य प्रशिक्षकपदी

गंभीरसाठीही ही मालिका महत्त्वाची

ही मालिका प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठीही अत्यंत महत्त्वाची असेल. यातून कसोटी क्रिकेटमधील त्यांचे भविष्य ठरू शकते. गंभीर यांच्या कार्यकाळात, भारत व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप आणि टी-२० विश्वचषकातील विजेतेपद मिळवले आहे मात्र, कसोटी क्रिकेटमधील परिस्थिती खूपच निराशाजनक आहे. सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाने WTC अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. या सायकलमध्ये भारताला नऊ कसोटी सामने खेळायचे आहेत आणि त्यापैकी जवळपास सर्वच सामने जिंकणे आवश्यक आहे.

गॅमधील आव्हान सोपे नाही

गॉलमधील आकडेवारीनुसार, १९९८ पासून येथे खेळल्या गेलेल्या ४९ कसोटी सामन्यांपैकी श्रीलंकेने २७ सामने जिंकले आहेत. या वर्चस्वात फिरकी गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली आहे. मुथय्या मुरलीधरन आणि रंगना हेराथ यांच्या फिरकरीच्या जादूने श्रीलंकेने या मैदानात वर्चस्व गाजवले आहे. परंतु त्यांच्याकडे अजूनही प्रभात जयसूर्या आणि रमेश मेंडिस यांच्यासारखे फिरकी गोलंदाज आहेत, ज्यांनी गॉलला आपला बालेकिल्ला बनवले आहे.

जुरेल आणि सरफराज कोणाला संधी मिळणार?

या दोन मधल्या फळीतील फलंदाजांची श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांविरुद्धची कामगिरी या कसोटीत निर्णायक ठरेल. सराव सामन्यात चांगली फलंदाजी न करूनही, सरफराज खानऐवजी जुरेलला पसंती दिली जाऊ शकते. भारताला केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल या पहिल्या तीन फलंदाजांकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. परंतु, गिल हा संघाच्या फलंदाजीचा मुख्य आधार असेल. साई सुदर्शनच्या दुखापतीनंतर पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकावरील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. त्याने सराव सामन्यात शतकही झळकावले होते. गॉलमध्ये एक चांगली खेळी करून, पडिक्कलला तिसऱ्या क्रमांकावरील आपला दावा अधिक मजबूत करण्याची सुवर्णसंधी आहे.

टीम इंडिया ३ फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवणार?

भारत कुलदीप यादव, मानव सुथार आणि रवींद्र जडेजा या तीन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी गुरुवारी याचे संकेत दिले होते, की तीन डावखुरे फिरकी गोलंदाज मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गॉलची खेळपट्टी फंलदाजीसाठी तितकी सोपी असणार नाही. सामना जसजसा पुढे जाईल तसतसे फिरकी गोलंदाजांना या मैदानावर मदत मिळू शकते.

प्रसिद्ध की गुरनूर कोणाची वर्णी लागणार?

या खेळपट्टीवर बहुतांश जबाबदारी फिरकी गोलंदाजांवर असेल, परंतु प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावरी मोठी जबाबदारी असणार आहे. परंतु, गुरनूर ब्रारनेही अलीकडे व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. रविचंद्रन अश्विनने प्रसिद्धऐवजी गुरनूरला पसंती दिली, परंतु प्रसिद्धच्या अनुभवामुळे त्याला प्राधान्य दिले जाऊ शकते. मात्र, कर्णधार शुभमन गिलने यावर मौन बाळगले आहे. त्याने एका पत्रकार परिषदेत सांगितले की, सामन्याच्या दिवशी निर्णय घेतला जाईल.

भारताचे संभाव्य प्लेइंग 11: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल/सरांश जैन/सरफराज खान, रवींद्र जडेजा, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा/गुरनूर ब्रार.

Sri Lanka Cricket: क्रिकेटविश्व हादरलं! खेळाडूंसोबतच्या वादानंतर श्रीलंकेच्या कोचचा मृत्यू; क्रिकेटपटू अटकेत

Web Title: Ind vs sl 1st test playing xi team india shubman gill galle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • IND vs SL
  • playing 11
  • Shubhman Gill
  • Test Series

संबंधित बातम्या

Shubman Gill: 1-2 नाही तर शुभमन गिल तोडणार 5 रेकॉर्ड्स, श्रीलंकेविरूद्ध रचणार कर्णधार इतिहास
1

Shubman Gill: 1-2 नाही तर शुभमन गिल तोडणार 5 रेकॉर्ड्स, श्रीलंकेविरूद्ध रचणार कर्णधार इतिहास

Sri Lanka Cricket: क्रिकेटविश्व हादरलं! खेळाडूंसोबतच्या वादानंतर श्रीलंकेच्या कोचचा मृत्यू; क्रिकेटपटू अटकेत
2

Sri Lanka Cricket: क्रिकेटविश्व हादरलं! खेळाडूंसोबतच्या वादानंतर श्रीलंकेच्या कोचचा मृत्यू; क्रिकेटपटू अटकेत

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?
3

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?

IND vs SL: गॉलमध्ये पाऊस फिरवणार सामन्यावर ‘पाणी’, वाढवली भारतीय संघाची चिंता
4

IND vs SL: गॉलमध्ये पाऊस फिरवणार सामन्यावर ‘पाणी’, वाढवली भारतीय संघाची चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.