IND vs Sri Lanka 2nd Test Weather Report
गॉल कसोटीप्रमाणेच दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. दुसऱ्या कसोटीच्या पाचही दिवस पावसाची शक्यता आहे. ‘अॅक्युवेदर’नुसार, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची ६४ टक्के शक्यता आहे. सकाळी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.
कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता ९६ टक्के आहे. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसाची शक्यता ९१ टक्के आहे. चौथ्या दिवशीही पाऊस सामन्याची मजा खराब करु शकतो. तर कोलंबो कसोटीच्या अंतिम दिवशीही पाऊस खेळाचा आनंद हिरावून घेऊ शकतो. सामन्याच्या पाचव्या दिवशी पाऊस पडण्याची ९१ टक्के शक्यता आहे. जर, दुसऱ्या कसोटीत पावसामुळे खेळात वारंवार व्यत्यय येऊ आला तर सामना रद्द होण्याचीही शक्यता आहे.
कोलंबोच्या सिंहलीज स्टेडियममधील खेळपट्टी साधारणपणे फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या मैदानावर संघ अनेकदा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ३१५ ते ३५० च्या दरम्यान असते, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे ३४० ते ३६० असते. त्याच वेळी, तिसऱ्या डावातील धावसंख्या २६०-२८० पर्यंत खाली येते, तर चौथ्या डावातील सरासरी धावसंख्या १७०-१९० च्या दरम्यान असते. त्यामुळे, कोलंबो कसोटीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
गॉल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने शानदार कामगिरी करत १६५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने १-० ने आघाडी घेतली.
भारत: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
श्रीलंका : लाहिरू उदारा, कामिल मिश्रा, पसिंदू सूरियाबंदरा, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला, केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो.






