Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: भारत-श्रीलंका महामुकाबल्यात हवामानाचा ‘खेळ’! पाचही दिवस पावसाचं सावट; कोलंबो टेस्टपूर्वी Weather Forecast समोर

IND vs Sri Lanka 2nd Test Weather Report: भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना २३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या सामन्यात कसा असेल हवामानाचा अंदाज, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 22, 2026 | 08:18 PM
IND vs Sri Lanka 2nd Test Weather Report

IND vs Sri Lanka 2nd Test Weather Report

Follow Us
Follow Us:
  • भारत-श्रीलंका टेस्टवर पावसाचं संकट
  • कोलंबोमध्ये हवामानाचा नेमका अंदाज काय?
  • कोलंबो खेळपट्टीचा अहवाल
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना रविवार २३ ऑगस्टपासून खेळला जाईल. हा सामना कोलंबो येथील सिंहलीज क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. गॉल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने यजमान श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव केला. मात्र, पहिल्या कसोटीवर पावसाचा मोठा परिणाम झाला, वारंवार खेळ थांबल्याने अनेक षटके वाया गेली. गॉल सामन्याप्रमाणेच या कसोटी सामन्यावरही पावसाचे सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दुसऱ्या कसोटीच्या पाचही दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सामन्यात कसा असेल हवामानाचा अंदाज, जाणून घेऊयात.

Hockey World Cup 2026: भारत-नेदरलँड्समध्ये ‘हायव्होल्टेज’ महामुकाबला! सामना कधी, कुठे अन् किती वाजता? जाणून घ्या

पाचही दिवस कसा असणार हवामानाचा अंदाज?

गॉल कसोटीप्रमाणेच दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. दुसऱ्या कसोटीच्या पाचही दिवस पावसाची शक्यता आहे. ‘अॅक्युवेदर’नुसार, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची ६४ टक्के शक्यता आहे. सकाळी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.

कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता ९६ टक्के आहे. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसाची शक्यता ९१ टक्के आहे. चौथ्या दिवशीही पाऊस सामन्याची मजा खराब करु शकतो. तर कोलंबो कसोटीच्या अंतिम दिवशीही पाऊस खेळाचा आनंद हिरावून घेऊ शकतो. सामन्याच्या पाचव्या दिवशी पाऊस पडण्याची ९१ टक्के शक्यता आहे. जर, दुसऱ्या कसोटीत पावसामुळे खेळात वारंवार व्यत्यय येऊ आला तर सामना रद्द होण्याचीही शक्यता आहे.

कोलंबो खेळपट्टीचा अहवाल

कोलंबोच्या सिंहलीज स्टेडियममधील खेळपट्टी साधारणपणे फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या मैदानावर संघ अनेकदा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ३१५ ते ३५० च्या दरम्यान असते, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे ३४० ते ३६० असते. त्याच वेळी, तिसऱ्या डावातील धावसंख्या २६०-२८० पर्यंत खाली येते, तर चौथ्या डावातील सरासरी धावसंख्या १७०-१९० च्या दरम्यान असते. त्यामुळे, कोलंबो कसोटीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

गॉल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने शानदार कामगिरी करत १६५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने १-० ने आघाडी घेतली.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11

भारत: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.

श्रीलंका : लाहिरू उदारा, कामिल मिश्रा, पसिंदू सूरियाबंदरा, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला, केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो.

IND vs SL: कुलदीपचा ‘गेम ओव्हर’ अन् सारांश जैनचा डेब्यू? टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा बदल

Web Title: Ind vs sl 2nd test weather forecast colombo pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Test Series
  • weather news

संबंधित बातम्या

IND vs SL: कुलदीपचा ‘गेम ओव्हर’ अन् सारांश जैनचा डेब्यू? टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा बदल
1

IND vs SL: कुलदीपचा ‘गेम ओव्हर’ अन् सारांश जैनचा डेब्यू? टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा बदल

IND Vs SL: भारतीय संघात मोठी खळबळ? श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत ‘हा’ खेळाडू नसणार? वाचा सविस्तर…
2

IND Vs SL: भारतीय संघात मोठी खळबळ? श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत ‘हा’ खेळाडू नसणार? वाचा सविस्तर…

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं
3

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं

IND vs SL: मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेचा मोठा डाव! दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, दोन नव्या खेळाडूंची एन्ट्री
4

IND vs SL: मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेचा मोठा डाव! दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, दोन नव्या खेळाडूंची एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.