Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय

IND vs SL Test series Sri lanka Announced free Entry: श्रीलंका क्रिकेट बोर्डाने चाहत्यांना एक महत्त्वपूर्ण भेट दिली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी कसोटी मालिकेदरम्यान चाहत्यांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 08, 2026 | 01:27 PM
IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय
  • चाहत्यांना स्टेडियममध्ये मिळणार फ्री एंट्री
  • भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) एक मोठी घोषणा केली आहे. बोर्डाने क्रिकेट चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. बोर्डाने जाहीर केले आहे की, १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ फेरीचा एक भाग आहे.

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप

सामन्यांदरम्यान चाहत्यांना मिळणार मोफत प्रवेश

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी कसोटी मालिकेदरम्यान क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश दिला जाईल, जेणेकरून क्रिकेट चाहत्यांना जागतिक दर्जाचे कसोटी क्रिकेट पाहण्याची एक अद्भुत संधी मिळेल. सामन्यांदरम्यान मोठ्या संख्येने प्रेक्षक येण्याची अपेक्षा आहे. त्यामुले सुरळीत हालचाल सुनिश्चित करण्यासाठी, एसएलसीने दोन्ही स्टेडियमसाठी विशेष प्रवेशद्वारांची घोषणा केली आहे. गॉल कसोटी पाहणारे प्रेक्षक स्टेडियमच्या गेट क्रमांक ४ मधून मोफत प्रवेश करु शकतील. कोलंबो सामन्यासाठी, प्रेक्षक गेट क्रमांक ३, ४, ५ आणि ७ मधून मैदानात प्रवेश करू शकतील.एसएलसीने देशभरातील क्रिकेट चाहते, तरुण खेळाडू, आणि क्रीडा चाहत्यांना या उपक्रमाचा लाभ घेऊन भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटचा थरार जवळून अनुभवण्याचे आवाहन केले आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका

मालिकेतील पहिला कसोटी सामना १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. तर दुसरा कसोटी सामना २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळवला जाईल. मालिका सुरु होण्यआधी भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या तीन दिवसीय सराव सामना खेळला जात आहे. या सराव सामन्यात शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्याने केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे .

भारतासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे, तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. भारताने शेवटचा कसोटी सामना जूनमध्ये न्यू चंदीगड येथे अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. त्यामुळे, डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत करण्यासाठी भारताला या मालिकेत चांगली कामगिरी करणे महत्वाचे आहे. श्रीलंका दौऱ्यासोबतच, सुभदीप घोष भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आपल्या कर्तव्याची जबाबदारी स्वीकारतील.

हवेत उडी, एका हाताने झेल अन् सारं क्रिकेटविश्व थक्क! Will Jacks च्या ‘सुपरमॅन कॅच’चा VIDEO व्हायरल

Web Title: Ind vs sl test series sri lanka announced free entry in stadium for fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • Sri Lanka cricket
  • Test Series

संबंधित बातम्या

IND vs SLC XI: सराव सामन्यात यशस्वी जायसवाल Flop, 2 चेंडूतच गारद; गौतम गंभीरचा चढला पारा
1

IND vs SLC XI: सराव सामन्यात यशस्वी जायसवाल Flop, 2 चेंडूतच गारद; गौतम गंभीरचा चढला पारा

IND Vs SL: हातात हात घालूनी आली संकटे! दुखापतींमुळे ‘हे’ स्टार खेळाडू मैदानाबाहेर, ‘या’ संघाची अडचण वाढली
2

IND Vs SL: हातात हात घालूनी आली संकटे! दुखापतींमुळे ‘हे’ स्टार खेळाडू मैदानाबाहेर, ‘या’ संघाची अडचण वाढली

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप
3

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप

IND Vs SL: गर्वाचे घर खाली! श्रीलंकेला बुडवायची स्वप्न मात्र विकेट कुठे मिळतेय? पहिल्या 20 ओव्हर्समध्ये…
4

IND Vs SL: गर्वाचे घर खाली! श्रीलंकेला बुडवायची स्वप्न मात्र विकेट कुठे मिळतेय? पहिल्या 20 ओव्हर्समध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.