Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs THA: आशिया कपमध्ये आज भारताची पहिली परीक्षा! टीम इंडियासमोर थायलंडचे आव्हान; कधी, कुठे अन् किती वाजता पाहाल LIVE सामना?

IND W vs THA W Asia cup 2026 match Live streaming: भारतीय महिला क्रिकेट संघ आजआपल्या महिला टी-२० आशिया कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. पहिला सामना थायलंज विरुद्ध खेळला जाणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 30, 2026 | 01:37 PM
IND W vs THA W Asia cup 2026 match

IND W vs THA W Asia cup 2026 match

Follow Us
Follow Us:
  • भारत आज आपल्या मोहिमेला करेल सुरुवात
  • भारतीय महिला संघासमोर थायलंडचे आव्हान
  • सामना कुठे आणि किती वाजता पाहाल?
महिला टी-२० आशिया कप २०२६ स्पर्धेची (Women’s Asia Cup 2026) दमदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना थायलंड आणि हाँगकाँग यांच्यात खेळला गेला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ आज, ३० ऑगस्ट रोजी आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारत आपला पहिला सामना गट ‘अ’ मधील थायलंडविरुद्ध खेळणार आहे. . हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाने महिला टी-२० आशिया कपमध्ये आपले वर्चस्व गाजवले आहे. आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये पाच वेळा सहभाग घेऊन तीन वेळा ट्रॉफीवर नाव कोरले आहे. भारत आणि थायलंडचा हा सामना तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता, जाणून घेऊयात.

Hardik-Bumrah च्या फिटनेसवर मोठी अपडेट! अफगाणिस्तान मालिकेत मैदानावर दिसणार? प्रिन्स यादव पूर्णपणे फिट

भारतीय संघ मजबूत स्थितीत

सध्या भारतीय संघ हा आशिया मधील सर्वात मजबूत संघ आहे. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा हे दोघे सलमामीवीर फलंदाजद डावाची सुरुवात करतील. या दोघींनीही यावर्षी आपल्या आक्रमक फलंदाजीने भरपूर धावा केल्या आहेत. दुखापतीमुळे जेमिमा रॉड्रिग्ज तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रतिका रावलला संधी दिली जाऊ शकते. हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांच्याकडूनही चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. अष्टपैलू दीप्ती शर्मा पुन्हा एकदा संघाला पुढे नेण्याची जबाबदारी सांभाळेल. तिने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय संघाची गोलंदाजीही खूप मजबूत आहे. रेणुका ठाकूर आणि क्रांती गौड वेगवान गोलंदाजी विभागाची कमान सांभाळतील. श्री चरणी आणि राधा यादव यांनी आपल्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजांना चारिमुंड्या चित्त केले आहे. तसेच, दुबईमध्ये फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. म्हणजेच याचा फायदा भारतीय फिरकीपटूंना होऊ शकतो.

आशिया कप सरावासाठी उत्तम संधी

महिला टी-२० आशिया कपनंतर लगेचच भारतीय संघ जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला आपल्या तयारीची चाचणी घेण्याची एक उत्तम संधी मिळेल. थायलंडने या स्पर्धेत आपला पहिला सामना हाँगकाँग चीनविरुद्ध आधीच खेळला असून, त्यात त्यांनी ६ धावांच्या फरकाने विजय मिळवला आहे.

सामना थेट कधी आणि कुठे पाहता येईल?

भारतीय संघ आणि थायलंड यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला जाईल. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरू होईल. त्यापूर्वी अर्धा तास आधी नाणेफेक होईल. हा सामना भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याव्यतिरिक्त, सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर थेट स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. तसेच, हा सामना डीडी भारती चॅनेलद्वारे डीडी फ्रीडिशवर विनामूल्य पाहता येईल.

भारताला मोठा झटका! ‘गोल्डन बॉय’ Neeraj Chopra अचानक Asian Games 2026 मधून बाहेर; समोर आलं धक्कादायक कारण

Web Title: Ind vs tha womens asia cup 2026 live streaming when and where to watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Indian Women Cricket Team
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

SL vs UAE: फक्त 7.5 षटके अन् गेम ओव्हर! UAE चा उडवला धुव्वा; श्रीलंकेचा T20I मधील सर्वात मोठा विजय
1

SL vs UAE: फक्त 7.5 षटके अन् गेम ओव्हर! UAE चा उडवला धुव्वा; श्रीलंकेचा T20I मधील सर्वात मोठा विजय

Asia Cup 2026: आता होणार असली टक्कर! थायलंडविरुद्ध ‘दंगल’साठी टीम इंडिया सज्ज; Playing XI मध्ये कोणाला मिळणार संधी?
2

Asia Cup 2026: आता होणार असली टक्कर! थायलंडविरुद्ध ‘दंगल’साठी टीम इंडिया सज्ज; Playing XI मध्ये कोणाला मिळणार संधी?

THA Vs HKG: अखेरच्या ओव्हरपर्यंत थरार! थायलंडचा हाँगकाँगवर दणदणीत विजय, आशिया कपमध्ये आज…
3

THA Vs HKG: अखेरच्या ओव्हरपर्यंत थरार! थायलंडचा हाँगकाँगवर दणदणीत विजय, आशिया कपमध्ये आज…

Asia Cup 2026: शाब्बास वाघिणींनो! पाकिस्तानसोबत हँडशेक करणार का? हरमनप्रीत कौर म्हणाली…
4

Asia Cup 2026: शाब्बास वाघिणींनो! पाकिस्तानसोबत हँडशेक करणार का? हरमनप्रीत कौर म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.