Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs WI : जसप्रीत बुमराहचा जलवा कायम! भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये केला ‘हा’ कारनामा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. या सह त्याने एक मोठी कामगिरी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 10, 2025 | 04:58 PM
Ind vs WI: Jasprit Bumrah's brilliance continues! He did 'this' feat for India in all three formats

Ind vs WI: Jasprit Bumrah's brilliance continues! He did 'this' feat for India in all three formats

Follow Us
Close
Follow Us:

Jasprit Bumrah created history, IND VS WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आणि त्याने इतिहास रचला आहे. जगातील नंबर १ कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराहचा हा ५० वा कसोटी सामना आहे. आता जसप्रीत बुमराह हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी किमान ५० सामने खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत कसोटीत २२२ बळी टिपल्या आहेत. तसेच त्याने ८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४९ बळी घेण्याची किमया साधली आहे. त्याने ७५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९६ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीमध्ये, बुमराहने १५ पाच विकेट्स काढल्या आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त दोन वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याला अद्याप टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकदा देखील पाच विकेट्स घेता आलेल्या नाहीत.

हेही वाचा : Ind vs WI : KL Rahul ची मोठी झेप! विराट-रोहित जोडीच्या खास यादीत सामील; WTC मध्ये केला ‘हा’ कारनामा

भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी ५० सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला होता. विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि केएल राहुल यांनी त्यानंतर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा एकूण ५० सामने खेळण्याची किमया साधली आहे.

मागील आठवड्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये जसप्रीत  बुमराहने टीम इंडियासाठी एकूण २० षटके गोलंदाजी केली होती. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या डावात त्याने तीन बळी घेतले होते, परंतु दुसऱ्या डावात त्याला एकही बळी मिळवता आला नाही. अहमदाबाद कसोटी सामन्यात बुमराहच्या तिसऱ्या बळीमुळे त्याला भारतात ५० कसोटी बळी पूर्ण करण्यास मोठी मदत झाली. तीन वेगवेगळ्या देशांमध्ये किमान ५० विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे.

हेही वाचा : Ind vs WI 2nd Test : यशस्वी जयस्वालचा दिल्लीत बोलबाला! डॉन ब्रॅडमनसह ‘या’ भारतीय दिग्गजाच्या यादीत झाला सामील

बुमराहने भारतात कसोटी सामन्यांमध्ये ५० बळी

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत भारतामध्ये खेळवण्यात आलेल्या १४ कसोटी सामन्यांमध्ये ५० फलंदाजांना माघारी पाठवले आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये त्याने १२ सामन्यांमध्ये ६४ फलंदाजांना बाद केले आहे.जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजाने इंग्लंडमध्येही १२ कसोटी सामन्यांमध्ये ५१ फलंदाजांना आपली शिकार बनवले होते. तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर जमा आहे.

Web Title: Ind vs wi jasprit bumrah creates big record for india in all three formats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Jaspreet Bumrah
  • Test Match

संबंधित बातम्या

Ind vs WI 2nd Test :  यशस्वी जयस्वालचा दिल्लीत बोलबाला! डॉन ब्रॅडमनसह ‘या’ भारतीय दिग्गजाच्या यादीत झाला  सामील 
1

Ind vs WI 2nd Test :  यशस्वी जयस्वालचा दिल्लीत बोलबाला! डॉन ब्रॅडमनसह ‘या’ भारतीय दिग्गजाच्या यादीत झाला  सामील 

Ind vs WI : KL Rahul ची मोठी झेप! विराट-रोहित जोडीच्या खास यादीत सामील; WTC मध्ये केला ‘हा’ कारनामा 
2

Ind vs WI : KL Rahul ची मोठी झेप! विराट-रोहित जोडीच्या खास यादीत सामील; WTC मध्ये केला ‘हा’ कारनामा 

IND vs WI : जयस्वालची यशस्वी खेळी, ठोकले शतक! साई सुदर्शनचे अर्धशतक, वाचा सविस्तर
3

IND vs WI : जयस्वालची यशस्वी खेळी, ठोकले शतक! साई सुदर्शनचे अर्धशतक, वाचा सविस्तर

IND  vs WI: दिल्ली कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी बांधल्या काळ्या पट्ट्या!  काय आहे कारण? वाचा सविस्तर 
4

IND  vs WI: दिल्ली कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी बांधल्या काळ्या पट्ट्या!  काय आहे कारण? वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.