Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये २ ऑक्टोबरपासून खेळला जात आहे. या सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 03, 2025 | 05:00 PM
IND vs WI 1st Test: Silence in the stadium without Virat and Rohit! No spectators in Ahmedabad Test; Video goes viral

IND vs WI 1st Test: Silence in the stadium without Virat and Rohit! No spectators in Ahmedabad Test; Video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

India vs West Indies first Test match : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये २ ऑक्टोबरपासून खेळला जात आहे. हा सामना २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली दिसत आहे, कारण प्रेक्षकांची संख्या नगण्य दिसून आली आहे. १,००,००० पेक्षा जास्त प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या भव्य स्टेडियममध्ये प्रेक्षकांची उपस्थिती अत्यंत कमी होती.

तथापि, काही लोकांचे असे म्हणणे आहे  की,  विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटची क्रेझ संपली असून म्हणून प्रेक्षकांनी कसोटीकडे पाठ फिरवली आहे. या रिकाम्या स्टेडियमचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : ILT20 मध्ये कुणी भाव दिला नाही! आता अश्विनने घेतला मोठा निर्णय; BBLमध्ये सिडनी थंडरसाठी खेळणार संपूर्ण हंगाम

एका वापरकर्त्याकडून सोशल मीडियावर रिकाम्या स्टेडियमचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आणि त्यावर लिहिले की हा रणजी ट्रॉफी सामना नाही. हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय भारतात खेळला जाणारा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे. तथापि, काही वापरकर्त्यांचे असे देखील म्हणणे आहे की उत्सवामुळे प्रेक्षक सामन्याला हजर राहिले नाहीत.

This is not a Ranji match, this is an international match happening in India without Rohit Sharma and Virat Kohli.🙏 #INDvWI pic.twitter.com/q7f9sRNiuc — 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) October 2, 2025

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना हा अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. अहमदाबादमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. त्यामुळे सर्वजण उत्सवात व्यस्त असतात. या सामन्याच्या निराशाजनक कामगिरीचे आणखी एक कारण म्हणजे हा सामना वेस्ट इंडिजसारख्या संघाविरुद्ध खेळवण्यात येत आहे. वेस्ट इंडिजचा संघ ८ व्या क्रमांकावर आहे आणि तो भारतासमोर टिकू शकणार नाही.

हेही वाचा : India U19 vs Australia U19 : भारतीय १९ वर्षांखालील संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये पराक्रम! ३६ वर्षांचा जुना विक्रम खालसा

सामन्याची स्थिती

अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळवण्यात येत आहे. या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर आटोपला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि जसप्रीत बूमराह यांनी टिच्चून गोलंदाजी केली. पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने पहिल्या डावात २ बाद १२१ धावा केल्या होत्या.

रविचंद्रन अश्विन बीबीएलचा संपूर्ण हंगाम खेळणार

 भारतीय संघाचा माजी दिग्गज अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये कोणताही खरेदीदार मिळू शकला नाही. लिलावादरम्यान, सहा संघांच्या फ्रँचायझींपैकी कोणीही त्याच्यावर बोली लावली नाही. ILT20 मध्ये विक्री न झाल्यानंतर, अश्विनने आता मोठा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये कुणी खरेदीदार न मिळाल्यावर अश्विनने बिग बॅश लीगचा संपूर्ण हंगाम खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आर. अश्विनने सिडनी थंडरसाठी संपूर्ण बीबीएल हंगाम खेळण्यास सहमती दर्शविली आहे.

Web Title: Ind vs wi no spectators in ahmedabad test due to absence of virat and rohit video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • virat kohali

संबंधित बातम्या

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?
1

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
2

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड
3

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार
4

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.