Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Ind vs Wi ODI : ‘हिटमन’ व ‘प्रिन्स’च्या शतकांचा धडाका; विंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली

Ind vs Wi ODI : वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा व कर्णधार शुभमन गिलने दणदणीत शतक झळकावले. दोघांनी सलामीला येत पहिल्या विकेटसाठी 255 धावांची भागीदारी रचली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 30, 2026 | 09:16 PM
 Ind vs Wi ODI : 'हिटमन' व 'प्रिन्स'च्या शतकांचा धडाका; विंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली

 Ind vs Wi ODI : 'हिटमन' व 'प्रिन्स'च्या शतकांचा धडाका; विंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली

Follow Us
Follow Us:
  • रोहितचे 35 वे दणदणीत शतक
  • गिलने 62 चेंडूंत शंभरी गाठली
  • प्रिन्सच्या नावे अनेक रेकॉर्ड
 

हिटमन रोहित शर्मा आणि भारताचा कर्णधार शुभमन गिलने येथे सुरू असलेल्या भारतविरुद्ध वेस्ट इंडिजच्या (Ind vs Wi ODI) दुसऱ्या वनडे सामन्यात सलामीला येत खणखणीत शतकं झळकावले. या दोघांनी सलामीला उतरत पहिल्या विकेटसाठी 255 धावांची भागीदारी केली. त्यांनी यात आणखीन 4 धावा जोडल्या असल्या तर 25 वर्षांपूर्वी सचिन तेंडूलकर व सौरव गांगुली यांच्या सलामीला येत केलेल्या 258 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडण्याची त्यांच्याकडे संधी होती.

याआधी वेस्ट इंडिजने भारतासमोर 7 बाद 405 धावांचे आव्हान दिले होते, मात्र गिल व रोहित शर्माच्या वादळीखेळीसमोर त्यांचे गोलंदाज टिकू शकले नाहीत. दोघांनीही त्यांच्या गोलंदाजांची पिसे काढत, आपली विकेट टिकवून ठेवली. गिलने आक्रमक खेळीचा नजराणा दाखवत अवघ्या 62 चेंडूंत दणदणीत शतक साजरे केले. तर रोहितने 72 चेंडूंत 10 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने आपले 35 वे शतक झळकावले. वेस्ट इंडिजला 26.2 व्या षटकात रोहितकरवी (101) पहिले यश मिळाले. जेडन सेल्सने रोहितला पायचीत करत हे वादळ शमवले.

Make that 3️⃣5️⃣ ODI HUNDREDS for Rohit Sharma 💯 An absolutely scintillating effort to power the chase 🙇‍♂️ Updates ▶️ https://t.co/6XCYRtZLAi#TeamIndia | #INDvWI | @mflone_ | @ImRo45 pic.twitter.com/MyrTT61yyG — BCCI (@BCCI) September 30, 2026

प्रिन्सने अनेक विक्रम रचले

भारतीय संघात प्रिन्स नावाने परिचित शुभमन गिलने वेस्ट इंडिजने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना धमाल केली. त्याने सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. अवघ्या 62 चेंडूंत त्याने आपले शतक झळकावले. अशाप्रकारे भारताच्या वतीने सर्वात जलद शतक करणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या स्थानी पोहचला आहे. या यादीत किंग विराट कोहली प्रथम क्रमांकावर असून त्याने जयपुरमध्ये 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 52 चेंडूंत शतक झळकावले होते. तर त्याच्यानंतर 60 चेंडूंत शतक ठोकणाऱ्या विरेंद्र सेहवागचा क्रमांक असून तिसऱ्या स्थानी पुन्हा विराटच्या 61 चेंडूंत ठोकलेल्या शतकाची नोंद आहे. तर चौथ्या स्थानी 62 चेंडूंत शतक झळकावणाऱ्या के. एल. राहुलचे नाव समाविष्ट आहे.

 

Rohit Sharma: हिटमॅनच्या वादळी खेळीत West Indies बुडालं; रोहित शर्माने केला 12 हजार रन्सचा रेकॉर्ड

Back-to-back ODI tons for India skipper Shubman Gill 💪 😮‍💨 📸: @BCCI 📝: https://t.co/qGrCAE7B7s pic.twitter.com/QtuZUSAVtS — ICC (@ICC) September 30, 2026

कमी डावात 11 वे शतक

तसेच कमी डावांत 11 वनडे शतक झळकावणाऱ्यांमध्ये गिलने तिसरे स्थान गाठले आहे. या यादीत पहिल्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला याचे नाव असून त्याने 64 डावात 11 शतक झळकावली होती, तर त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचाच क्विंटन डिकॉकचा क्रमांक येतो, त्याने 65, तर तिसऱ्या क्रमांकावर गिलने 68 डावांत ११ शतक झळकावल्याची नोंद आयसीसीच्या रेकॉर्डमध्ये झाली आहे.

ICC ODI Worldcup : 2027 वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक उद्या होणार जाहीर, जागतिक तिकिट लॉटरीचीही घोषणा

 

Web Title: Ind vs wi odi rohit and shubman gill century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Rohit Sharma: हिटमॅनच्या वादळी खेळीत West Indies बुडालं; रोहित शर्माने केला 12 हजार रन्सचा रेकॉर्ड
1

Rohit Sharma: हिटमॅनच्या वादळी खेळीत West Indies बुडालं; रोहित शर्माने केला 12 हजार रन्सचा रेकॉर्ड

IND Vs WI: अबब! विंडीजच्या गड्यांनी लयं बेक्कार धुतलं; Team India 400 पार करणार? गिल-कोहली…
2

IND Vs WI: अबब! विंडीजच्या गड्यांनी लयं बेक्कार धुतलं; Team India 400 पार करणार? गिल-कोहली…

IND Vs WI: जॉन कॅम्पबेलने काढली भारताची पिसं; केवळ 65 बॉल्समध्ये ठोकले खणखणीत शतक
3

IND Vs WI: जॉन कॅम्पबेलने काढली भारताची पिसं; केवळ 65 बॉल्समध्ये ठोकले खणखणीत शतक

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया
4

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.