Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM 3rd T20 Live: भारताची विजयी हॅट्ट्रिक! झिम्बाब्वेला 35 धावांनी हरवत केला क्लीन स्वीप

IND beat Zim 3rd t20i live Score 3-0 clean sweep भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 35 धावांनी पराभव केला. यासह मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 26, 2026 | 08:48 PM
IND vs ZIM 3rd T20 Live: भारताची विजयी हॅट्ट्रिक! झिम्बाब्वेला 35 धावांनी हरवत केला क्लीन स्वीप
Follow Us
Follow Us:
  • भारताची विजयी हॅट्ट्रिक
  • टी-20 मालिका 3-0 ने जिंकली
  • झिम्बाब्वेला 35 धावांनी हरवत केला क्लीन स्वीप
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्याच्या टी२० मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्या टीम इंडियाने झिम्बाब्वेचा ३५ धावांनी धु्व्वा उडवला. भारताने झिम्बाब्वेला पराभूत करून विजयाची हॅटट्रिक मारली आणि झिम्बाब्वेचा क्लीन स्वीप केला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि झिम्बाब्वेला गोलंदाजीचे आव्हान दिले. वैभव सूर्यवंशीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकांमध्ये १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, झिम्बाब्बेने २० षटकांमध्ये फक्त १५६ धावाच करु शकला. श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारताचा हा पहिला टी२० मालिका विजय आहे. यापूर्वी, त्याच्या कर्णधारपदाखाली भारताला आयर्लंड आणि इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता.

Commonwealth Games 2026: सुवर्ण हुकले, पण ऋषिकांता सिंहची ऐतिहासिक कामगिरी; भारताला मिळवून दिले पहिले रौप्यपदक

भारताने झिम्बाब्वेचा केला क्लीन स्वीप

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. अभिषेक शर्मा ब्लेसिंग मुझारबानीच्या गोलंदाजीवर फक्त २ धावा करुन बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या ईशान किशनने वैभव सूर्यवंशीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. ११ व्या षटकात सिकंदर रझाने ईशान किशनला बाद केले आणि भारताला दुसरा विकेट पडली. ईशान किशनने चार चौकारांच्या मदतीने २८ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. भारताची तिसरी विकेट १५ व्या षटकात वैभव सूर्यवंशीच्या रूपाने पडली. शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला वेस्ली माधवरेने बाद केले. वैभव सूर्यवंशीने ४९ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि चार षटकारांसह ८१ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर १८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ब्रेड इव्हान्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. श्रेयस अय्यरने दोन चौकारांच्या मदतीने १८ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या. तिलक वर्मा ११ धावा करुन नाबाद राहिला, तर रिंकू सिंग डावाच्या शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. रिंकू सिंगने दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या. भारताने २० षटकांत पाच विकेट्स गमावून १९२ धावांचा डोंगर उभा केला.

झिम्बाब्वेला १५६ धावांवर गुंडाळले

लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची फलंदाजी खराब होती, परंतु रायन बर्लने दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. परंतु, त्याचे अर्धशतकही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. बर्ल ४३ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला. वेस्ली माधेवेरेने २८, तर बेन करनने २० धावा केल्या. भारताकडून मयंक यादवने तीन, तर यश ठाकूरने दोन विकेट्स घेतले. अशोक शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. झिम्बाब्वेला २० षटकांत सात विकेट्स गमावून केवळ १५७ धावाच करता आल्या. भारताने झिम्बाब्वेवर ३-० ने क्लीन स्वीप पूर्ण केला.

दोन्ही संघांचे प्लेइंग ११

भारत : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयंक यादव.

झिम्बाब्वे : ब्रायन बेनेट, बेन कुरन, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली मधवेरे (विकेटकीपर), तडवनाशे मारुमणी, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी.

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियासमोर नवे संकट! एकाच वेळी ‘हे’ 5 स्टार खेळाडू दुखापतग्रस्त; गिलसमोर मोठी अडचण

Web Title: Ind vs zim 3rd t20 live india clean sweep zimbabwe 3 0 series win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Shreyas Iyer
  • Sikandar Raza
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

मूर्ती लहान पण कीर्ती महान! Vaibhav Sooryavanshi चा झिम्बाब्वेविरुद्ध धुमाकूळ, नावावर नोंदवला ‘हा’ ऐतिहासिक रेकॉर्ड
1

मूर्ती लहान पण कीर्ती महान! Vaibhav Sooryavanshi चा झिम्बाब्वेविरुद्ध धुमाकूळ, नावावर नोंदवला ‘हा’ ऐतिहासिक रेकॉर्ड

IND vs ZIM 3rd T20 Live: वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी; भारताचा दमदार डाव, झिम्बाब्वेसमोर 193 धावांचे लक्ष्य
2

IND vs ZIM 3rd T20 Live: वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी; भारताचा दमदार डाव, झिम्बाब्वेसमोर 193 धावांचे लक्ष्य

IND vs ZIM 3rd T20 Live: टीम इंडियाची क्लीन स्वीपची तयारी! भारताने जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, संघात दोन मोठे बदल
3

IND vs ZIM 3rd T20 Live: टीम इंडियाची क्लीन स्वीपची तयारी! भारताने जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, संघात दोन मोठे बदल

ICC T20 Ranking: 15 दिवसांत पलटला संपूर्ण खेळ! भारतीय संघ पुन्हा ठरला T20 क्रिकेटचा बादशाह
4

ICC T20 Ranking: 15 दिवसांत पलटला संपूर्ण खेळ! भारतीय संघ पुन्हा ठरला T20 क्रिकेटचा बादशाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.