Ind Vs Zim : भारताकडून झिम्बॉब्वे 'क्लीन स्वीप'; वैष्णवी शर्माच्या जादुई फिरकीनंतर फलंदाजांची धुवांधार बॅटींग, सौजन्य : एक्स
Ind Vs Zim : वडोदरा येथे पार पडलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात भारतीय महिला संघाने 8 विकेट्सने विजय मिळवत झिम्बॉब्वेला ‘क्लीन स्वीप’ केले. याअगोदर फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माने घेतलेल्या पाच गडीच्या जोरावर भारताने त्यांना सर्वबाद 131 धावांत रोखले होते.
या धावांचा पाठलाग करताना भारताच्या पहिल्या फळीने जास्त सामना ताणला नाही. अखेर 33 ओव्हर्स शिल्लक राखताना धावा करत तिसरा सामना आपल्या खिशात घातला.
झिम्बॉब्वेने दिलेल्या 132 धावांचा पाठलाग करताना भारताला पहिल्याच चेंडूवर यास्तिका भाटीयाच्या रुपात पहिला धक्का बसला. नोमवेलो सिबांडाने भाटीयाला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर प्रतिका रावल (नाबाद 59 ) व हर्लिन देवलंने संघाचा डाव सावरला. दरम्यान, हर्लिन (19) लॉरेन फिरीची शिकार ठरली. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या शेफाली वर्माने धुवांधार फलंदाजीस सुरुवात केली. प्रतिकाने 4 चौकार व 3 षटकार ठोकले, तर शेफालीने 6 चौकार व 2 षटकारासह नाबाद 51 धावा केल्या.
ICC T20 रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! Abhishek Sharma ने ईशान किशनला पछाडलं; बनला जगातील नंबर 1 फलंदाज
झिम्बॉब्वेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीची मॉडेस्टर मुपाचिकवा (37) आणि कर्णधार जोसेफीन नमकोवो (35) वगळता त्यांचा कोणताच फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. वैष्णवी शर्माने त्यांना मनमोकळेपणाने खेळूच दिलं नाही.
सायली सतघरेने लॉर्यन फिरीला भोपळाही फोडू न देता झिम्बॉब्वेला पहिला धक्का दिला. त्यानंतर क्रांती गोडने आक्रमक चिपो तिरिपानो (4)ला शेफाली करवी झेलबाद करत झिम्बॉब्वेची अवस्था 2 बाद 12 धावा अशी केली.
IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?
त्यानंतर हाकेच्या अंतरावर बिल्वड बिझा (1) वैष्णवी शर्माचा पहिला शिकार ठरली. तर 7 चौकार ठोकत खेळपट्टीवर टिकलेल्या मोडेस्टरला वैष्णवीने जास्त आक्रमक होऊ दिलं नाही. चेडझा धुरूरू (20)ने काही काळ नमकोवोसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही वैष्णवीने जिंतामनी कलिताकरवी झेलबाद केले.
तसेच मिशेल मुवांगा चौथी (6), तर नायशा ग्वानझुरू (10) वैष्णवीची पाचवी शिकार ठरली. वैष्णवीने 10 षटकात 39 धावा देत पाच विकेट मिळवण्याची किमया केली. वैष्णवीनंतर क्रांती गौड व सायली सतघरेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
Ans: झिम्बाब्वेने दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारतीय महिला संघाने केला.
Ans: वैष्णवी शर्माने 10 षटकांत 39 धावा देत पाच विकेट्स घेतल्या.
Ans: क्रांती गौड आणि सायली सतघरे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.






