Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs PAK W:आशिया कपमध्ये आज रंगणार थरार! भारत-पाकिस्तान आमनेसामने; महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणार?

IND W vs PAK W Asia Cup 2026: महिला आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आधीच उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 05, 2026 | 01:21 PM
IND W vs PAK W Asia Cup 2026

IND W vs PAK W Asia Cup 2026

Follow Us
Follow Us:
  • भारत-पाकिस्तान आमनेसामने
  • महिला आशिया कपमध्ये महामुकाबला
  • प्लेइंग-11 मध्ये मोठा बदल?

भारतीय महिला संघ आज आशिया कपमध्ये (Womens Asia Cup 2026) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करेल. या दोन संघांमधील हा गट फेरीचा सामना शनिवारी दुबईमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय महिला संघाने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत आधीच स्थान मिळवले आहे आणि. आजचा हा सामना जिंकून ते आपली विजयी मालिका सुरु ठेवण्यासाठी मैदानात उतरतील. पाकिस्तानविरुद्ध भारतीय महिला संघाची कामगिरी एकतर्फी राहिली आहे. परंतु, जेव्हा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात, तेव्हा सामना अत्यंत रोमांचक होतो. पाकिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग ११ कशी असेल, जाणून घेऊयात.

China Masters मध्ये श्रीकांतची कमाल! चुरशीच्या लढतीत व्हिक्टर लाईला चारली धूळ; शानदार विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक

भारताची फलंदाजी मजबूत स्थितीत

भारतासाठी डावखुरी स्मृती मंधाना आणि उजव्या हाताची शफाली वर्मा डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. मागील सामन्यात दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली होती. मंधानाने ६४ चेंडूंमध्ये १२४ धावा केल्या, तर शफालीनेही १७ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या.

प्रतिका रावल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकते. तिने पहिल्या सामन्यात १२ चेंडूंमध्ये १० धावा केल्या. पण, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ती चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. हरमनप्रीत कौर चौथ्या क्रमांकावर आणि रिचा घोष पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतात. घोष सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आ. दीप्ती शर्मा आणि भारती फूलमाली यादेखील मधल्या फळीत खेळताना दिसू शकतात.

गोलंदाजांकडूनही मोठ्या अपेक्षा

दीप्ती शर्मा आणि प्रेमा रावत गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करतील. श्री चरणी आणि क्रांती गौड हे देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मागील सामन्यात दीप्ती शर्माने भारतासाठी तीन विकेट्स घेतले, तर प्रेमा रावतने दोन विकेट्स घेतले. नंदिनी शर्मानेही दोन विकेट्स घेतले आणि श्री चरणीनेही दोन विकेट्स घेतले. पाकिस्तानविरुद्धही भारतीय संघाला या गोलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा असतील. पाकिस्तानने आपल्या सलामीच्या सामन्यात थायलंडला पराभूत केले आणि उपांत्य फेरीच्या जागेसाठीच्या शर्यतीत तो कायम आहे.

दोन्ही संघांतील संभाव्य ११ खेळाडू

भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, नंदिनी शर्मा/रेणुका ठाकूर, श्री चरणी, क्रांती गौड.

पाकिस्तान : मुनीबा अली (यष्टीरक्षक), शवाल झुल्फिकार, गुल फिरोजा, आयेशा जाफर, सदफ शमास, फातिमा सना (कर्णधार), अयमान फातिमा, उम-ए-हानी, तुबा हसन, नशरा संधू, सादिया इक्बाल.

मेजर ध्यानचंद महान खेळाडू क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा; इनरव्हील क्लब ऑफ वाशिमचा उपक्रम

Web Title: Ind w vs pak w womens asia cup 2026 playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • IND VS PAK
  • IND W vs PAK W
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

Smriti Mandhana: ‘माझ्यामुळे १० टक्के महिलासुद्धा…’ हाँगकाँगविरुद्ध शतक ठोकताच काय म्हणाली स्मृती?
1

Smriti Mandhana: ‘माझ्यामुळे १० टक्के महिलासुद्धा…’ हाँगकाँगविरुद्ध शतक ठोकताच काय म्हणाली स्मृती?

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?
2

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम राहणार? अमोल मुझुमदार म्हणाले…
3

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम राहणार? अमोल मुझुमदार म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.