Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूचा ‘तो’ राडा; BCCI ने दिली प्रतिक्रिया, कारवाई होणार?

BCCI Take Actions Against Vaibhav Sooryavanshi after Fight With Sri Lankan Vishen Halambage: भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकन खेळाडूमध्ये झालेल्या वादानंतर सामनाधिकाऱ्यांनी दोन्ही खेळाडूंना ५०% दंड आणि तिलक वर्माला ३०% दंडाची शिफारस केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 18, 2026 | 02:55 PM
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूचा ‘तो’ राडा; BCCI ने दिली प्रतिक्रिया, कारवाई होणार?
Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशी-श्रीलंकन खेळाडू वाद
  • BCCIची मोठी प्रतिक्रिया
  • सोशल मीडियावरील चर्चांना पूर्णविराम
भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील नुकत्याच झालेल्या सामन्यादरम्यान युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि एका श्रीलंकन ​​खेळाडूमध्ये मैदानावर झालेला वाद झाला. हा वाद सतत चर्चेचा विषय बनला आहेत्तानुसार, या घटनेनंतर सामनाधिकारी प्रदीप जयप्रकाश यांनी दोन्ही खेळाडूंना ५० टक्के दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे, जो त्यांच्या सामना शुल्कातून कापला जाईल. दरम्यान, भारत ‘अ’ संघाचा कर्णधार तिलक वर्मा याला एकूण ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. बीसीसीआयही वैभव सूर्यवशीवर कारवाई करेल अशीही चर्चा आहे. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी परिस्थिती स्पष्ट केली आहे.

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

आयसीसी ‘अ’ संघाच्या सामन्यांमध्ये थेट दंड आकारत नाही. त्यामुळे, सामनाधिकाऱ्यांच्या शिफारसी बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेटकडे पाठवण्यात आल्या आहेत. आता पुढील निर्णय दोन्ही मंडळांवर अवलंबून आहे, जे ठरवतील की प्रस्तावित दंडांना मान्यता देऊन त्यांची अंमलबजावणी करायची की नाही.

बीसीसीआय हस्तक्षेप करणार नाही

देवजित सैकिया यांनी स्पष्टपणे सांगितले की, मैदानावर घडणाऱ्या घटनांवर निर्णय घेण्याचा अधिकार सामनाधिकारी आणि पंचांना आहे. अशा प्रकरणांमध्ये बीसीसीआयची कोणतीही भूमिका नसते. सैकिया म्हणाले, “बीसीसीआय कारवाई करण्याचा विचार करत असल्याच्या अटकळींसह सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. पण सामनाधिकारीच्या अधिकारक्षेत्रात बीसीसीआयने हस्तक्षेप करावा, असे तुम्हाला वाटते का?”

सैकीया म्हणाले की, मंडळ अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणार नाही, कारण असे एक केल्यास चुकीचे उदाहरण ठरेल. ते पुढे म्हणाले की, ‘अशा प्रकरणांमध्ये बीसीसीआय निर्णय घेऊ शकत नाही. ज्या क्षेत्रात सामनाधिकारी आणि पंच हे मैदानातील घटनांवर निर्णय घेण्यासाठी अधिकृत अधिकारी आहेत, तिथे आपण हस्तक्षेप करू नये. जर मैदानावर एखाद्या खेळाडू किंवा क्रिकेटच्या कृतीशी संबंधित कोणताही वाद निर्माण झाला, तर तो नियुक्त अधिकाऱ्यांनी सोडवला पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये थेट हस्तक्षेप केल्यास सामनाधिकाऱ्याच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करण्यासारखे होईल, जे बीसीसीआय करणार नाही आणि आमच्या नियमांमध्ये तशी तरतूदही नाही.’

VIDEO | BCCI secretary Devajit Saikia says the board will not interfere in matters concerning Vaibhav Sooryavanshi’s on-field altercation with a Sri Lankan A player, insisting that any action falls within the jurisdiction of the match referee and umpires under ICC regulations.… pic.twitter.com/GVMkJyGbze — Press Trust of India (@PTI_News) June 18, 2026

नियमांमध्ये बीसीसीआयची कोणतीही भूमिका नाही

देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले की, बीसीसीआयचे नियम आणि आयसीसीच्या नियमांनुसार मंडळाला अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. ते म्हणाले, ‘खेळामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार बीसीसीआयला नाही. जे काही घडले ते खेळाचाच एक भाग होता आणि बीसीसीआयचे नियम व आयसीसीच्या नियमांनुसार मंडळाची त्यात कोणतीही भूमिका नाही.’

सोशल मीडियावरील अफवा निराधार

सैकिया यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा फेटाळून लावल्या. बीसीसीआय कारवाई करणार असल्याची चर्चा पूर्णपणे निराधार असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, ‘खूप अफवा पसरवल्या जात आहेत, पण त्या निराधार आहेत. मी तुम्हाला खात्री देतो की, बीसीसीआय सामनाधिकाऱ्याच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करणार नाही. मैदानावर काही चुकीचे घडले असेल, तर संबंधित अधिकारी त्यावर कारवाई करतील.’

श्रीलंकन खेळाडूंना दंड?

सूत्रांनुसार, अतिरिक्त अपील केल्याबद्दल श्रीलंकन खेळाडू डिकवेलाला दंड ठोठावण्यात आला. सुपर ओव्हरमधील विजयानंतर भारतीय फलंदाज आणि श्रीलंकन खेळाडू भिडले. यानंतर, विशन हलंबगेवर कारवाई झाली. खरं तर, वादादरम्यान हलंबगे वैभवच्या खूप जवळ गेला, त्यानंतर, दोन्ही खेळाडूंमध्ये धक्काबुक्की झाली. कोणत्या खेळाडूला आणि किती दंड ठोठावण्यात आला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Tri Nation A series: तिलक वर्मा ब्रिगेडची कमाल; अफगाणिस्तानला चारीमुंड्या चित करत फायनलमध्ये धडक! अंतिम सामना कधी?

Web Title: India a vs sri lanka a vaibhav sooryavanshi vishen halambage fight controversy bcci statement fine sooryavanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • BCCI India
  • India A Team
  • sri lanka cricket team
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?
1

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन की अभिषेक शर्मा? कोण करणार Opening? श्रेयसने दिले उत्तर
2

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन की अभिषेक शर्मा? कोण करणार Opening? श्रेयसने दिले उत्तर

ऑक्टोबर महिन्यात रेड बॉलचा थरार! India A अन् AUS A भिडणार; Devdutt Padikkal करणार नेतृत्व
3

ऑक्टोबर महिन्यात रेड बॉलचा थरार! India A अन् AUS A भिडणार; Devdutt Padikkal करणार नेतृत्व

Duleep Trophy: ‘पहिल्या Inning मध्ये माझ्याबरोबर हेच झालं…’, वैभव सूर्यवंशीने दिले अंपायरला उत्तर, तिलकला टक्कर
4

Duleep Trophy: ‘पहिल्या Inning मध्ये माझ्याबरोबर हेच झालं…’, वैभव सूर्यवंशीने दिले अंपायरला उत्तर, तिलकला टक्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.