
photo- social media
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने जपानवर दबाव निर्माण केला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर आशीष तानी पुर्तीने अचूक गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय बचावफळीने जपानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. २८ व्या मिनिटाला आशीषने दुसरा गोल करत आघाडी २-० अशी वाढवली. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत कर्णधार केतन कुशवाहाने शानदार फील्ड गोल करत भारताला ३-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाचा आक्रमक खेळ कायम राहिला. ३४ व्या मिनिटाला पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतर आशीष तानी पुर्तीने गोल करत आपली शानदार हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यामुळे भारताची आघाडी ४-० ची आघाडी घेतली आणि सामना जवळपास भारताच्या खिशात गेला. चौथ्या क्वार्टरमध्ये जपानकडून गाकू नुमाडाने एकमेव गोल केला, पण यजमान संघ भारताच्या आक्रमक खेळासमोर टिकू शकला नाही. भारताने अखेर ४-१ असा विजय मिळवत आशिया कपचे विजेतेपद पटकावले.
𝐋𝐄𝐓’𝐒 𝐊𝐄𝐄𝐏 𝐓𝐇𝐄 𝐏𝐀𝐑𝐓𝐘 𝐆𝐎𝐈𝐍𝐆! 🇮🇳🏆 The perfect ending to a remarkable journey as the Indian Men’s U18 Team defeated Japan 4-1 in the U18 Asia Cup 2026 Final to be crowned Champions. 💙✨#HockeyIndia #IndiaKaGame #U18AsiaCup2026 @imsardarsingh8 pic.twitter.com/Ctmw144VIA — Hockey India (@TheHockeyIndia) June 6, 2026
A splendid accomplishment by our young hockey players! Congratulations to the Indian Men’s U18 Hockey Team on winning the Men’s U18 Asia Cup 2026. The team displayed exceptional skill and teamwork throughout the tournament, culminating in a memorable victory in the final. This… pic.twitter.com/w5xIVAvN13 — Narendra Modi (@narendramodi) June 6, 2026
पुरुष अंडर-१८ आशिया कपमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर, हॉकी इंडियाने (Hockey India) पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूस ३ लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला १.५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच महिला अंडर-18 संघाने कांस्यपदक जिंकल्यानंतर त्यांनाही रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले. हॉकी इंडियाने भारतीय १८ वर्षांखालील महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूसाठी १ लाख रुपयांचे रोख बक्षीस, तसेच सपोर्ट स्टाफसाठी प्रत्येकी ५०,००० रुपयांची घोषणा केली.