Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs WI : भारताची बातच निराळी! दिल्लीत मोडला स्वतःचाच विक्रम; वेस्ट इंडिजला धूळ चारून रचला इतिहास 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने आपल्या खिशात टाकला. या विजयासह भारताने कसोटी मालिका २-० अशी जिंकली आणि इतिहास रचला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 14, 2025 | 02:20 PM
Ind vs WI: India's story is unique! They broke their own record in Delhi; They created history by defeating West Indies

Ind vs WI: India's story is unique! They broke their own record in Delhi; They created history by defeating West Indies

Follow Us
Close
Follow Us:

India created history in the Delhi Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात  दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने आपल्या खिशात टाकला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या  सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने धूळ चारली. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा २-० असा पराभव करून मलिका जिंकली.

हेही वाचा : केएल राहुल, रवींद्र जडेजा, शुभमन गिल की कुलदीप यादव… IND vs WI कसोटी मालिकेत सामनावीर आणि मालिकावीर कोणाला केले घोषित?

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली त्याने मायदेशात पहिली मालिका जिंकली आहे आणि त्यासोबत २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याचा पहिलाच मालिका विजय ठरला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सात सामने खेळले असून भारताने चार सामने जिंकले आहेत, दोन गमावले आहेत आणि एक अनिर्णित राहिला आहे.

यासह, अरुण जेटली स्टेडियमवर भारताने आपली अजिंक्य मालिका कायम रखण्यास यश मिळवले आहे. भारतीय संघाने या मैदानावर आता सलग १४ कसोटी विजय मिळवण्याची किमया साधली आहे. ज्याची सुरुवात मार्च १९९३ मध्ये झिम्बाब्वेवर एक डाव आणि १३ धावांनी विजय मिळवून झाली होती. ही भारताची मायदेशात सर्वात मोठी अजिंक्य मालिका राहिली आहे. मोहाली आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारताच्या १३ सामन्यांच्या अपराजित मालिकेचा हा विक्रम ठरला आहे.

चार फलंदाजांनी ठोकली शतके

दुसऱ्या कसोटी सामन्यात चार फलंदाजांनी शतके झळकावली आहेत,भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले. यशस्वी जयस्वालने १७५ आणि शुभमन गिलने नाबाद १२९ धावा केल्या आहेत. तर वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी शतके झळकावली आहेत. जॉन कॅम्पबेलने त्यांचे पहिलेच कसोटी शतक झळकावले. कॅम्पबेलने ११५ आणि शाई होपने १०३ धावा केल्या आहेत.

हेही वाचा : शुभमन गिलने मोडली एमएस धोनीची परंपरा? ​​India vs West Indies मालिका जिंकल्यानंतर त्याने कोणाला ट्रॉफी दिली…

भारताने सामना जिंकला

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या  सामन्यात, भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून ५१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर संपला. भारताला पहिल्या डावाच्या आधारे २७० धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर, भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध फॉलोऑन लावला. फॉलोऑनमध्ये वेस्ट इंडिजने ३९० धावा करून भारतासमोर १२१ धावांचे लक्ष्य उभे केले.  जे भारताने केवळ तीन विकेट गमावून पूर्ण केले आणि सामन्यासह भारताने मलिका जिंकली.

Web Title: India created history by defeating west indies in delhi test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Shubhman Gill
  • Test Match

संबंधित बातम्या

Ind vs Sa 2nd Test : भारताचा लाजिरवाणा पराभव! पंत आर्मीला 408 धावांनी धूळ चारत दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास 
1

Ind vs Sa 2nd Test : भारताचा लाजिरवाणा पराभव! पंत आर्मीला 408 धावांनी धूळ चारत दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास 

Ind vs Sa 2nd Test : भारतीय संघ पराभवाच्या छायेत! रवींद्र जडेजा सांगू लागला बहाणे; परिस्थिती बिघडण्याचे कारण काय?
2

Ind vs Sa 2nd Test : भारतीय संघ पराभवाच्या छायेत! रवींद्र जडेजा सांगू लागला बहाणे; परिस्थिती बिघडण्याचे कारण काय?

Ind vs Sa 2nd Test : दोन बळी अन् रवींद्र जडेजाने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला ‘हा’ पराक्रम 
3

Ind vs Sa 2nd Test : दोन बळी अन् रवींद्र जडेजाने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला ‘हा’ पराक्रम 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.