
ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर 'दादा' स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video
लंडन येथील ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर भारतीय संघाने जादू केली आहे. भारतीय संघाने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. भारतीय क्रिकेटच्या दिव्यांग संघाने इंग्लंडकहा सिरिजमधील शेवटच्या सामन्यात ११८ रन्सने पराभव केला आहे. त्यानंतर भारताच्या संघाने लॉर्डसच्या प्रसिद्ध बाल्कनीत जाऊन माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या २०२२ च्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. आयकॉनिक स्टाईलमध्ये टी-शर्ट काढून आणि ब्लेजर हवेत फिरवत जोरदार आनंद साजरा केला. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
भारत आणि इंग्लंड यांचामध्ये दिव्यांग क्रिकेट सिरिज खेळवण्यात आली होती. या सिरिजचा शेवटचा सामना लॉर्डसवर खेळला गेला. हा सामना बहर्तणे ११८ रन्सने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २०६ रन्स केल्या. सिरिजमधील ही भारताची सर्वाधिक रन्सची खेळी होती. त्यानंतर भारताने अचूक आणि भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला केवळ ८८ रन्सवर ऑल आउट केले.
When India wins at Lord’s, the celebrations hit different. A moment of pure cricketing joy on the Lord’s Balcony — coats off, spirits high, and the Tricolour flying with pride. 118 runs. One unforgettable celebration.@imRaviKChauhan@official_idca pic.twitter.com/o6IuoRJto8 — Differently Abled Cricket Council of India (@dcciofficial) August 19, 2026
भारतीय संघाने इंग्लंडचा ११८ रन्सने पराभव केला आहे. इंग्लंडच्या संघाचा कर्णधार कॅलम फ्लिनने भारताच्या खेळीचे कौतुक केले आहे. भारतीय संघ विजयासाठी पात्र असल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र हा सामना जिंकून देखील भारताला सिरिज जिंकता आलेली नाही. इंग्लंडने ७ सामन्यांची सिरिज ४-३ ने जिंकली आहे.
२००२ मध्ये लॉर्डसच्या मैदानावर सौरव गांगुलीने बाल्कनीमध्ये जर्सी काढून हा ऐतिहासिक विजय साजरा केला होता. अगदी तसाच क्षण या खेळाडूंनी साजरा केल्याचे पाहायला मिळाले. भारताचा विजय होताच सर्व खेळाडूंनी बाल्कनीत येऊन टी-शर्ट आणि सपोर्ट स्टाफने ब्लेजरने हवेत काढून फिरवले होते. डिफरेंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडियाने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.