भारत-पाकिस्तान दोनदा भिडणार (फोटो- सोशल मीडिया)
पुढील १० दिवसांच्या आत भारत आणि पाकिस्तान संघ दोन वेळेस भिडणार आहेत. चाहत्यांना सलग दोन महामुकाबले पाहायला मिळणार आहेत. उद्या 30 ऑक्टोबर रोजी या पर्वाची सुरुवात होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याने जगभरातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांची उत्सुकता ताणली जाते. आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या या लढतीमुळे क्रीडा जगतात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
उद्या म्हणजेच 30 ऑक्टोबर 2026 शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. मात्र हा सामना कसोटी किंवा वनडे सामन्यासारखा नसणार आहे. तर हा सामना केवळ प्रत्येकी 6-6 ओव्हर्सकहा असणार आहे. हा सामना हाँगकाँग सिक्सेस या रोमांचक स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. हा हाँगकाँगच्या मोंग कोक येथील ऐतिहासिक ‘मिशन रोड ग्राउंड’ वर होणार आहे.
भारतीय वेळेनुसार सामना उद्या सकाळी 11.45 वाजता सुरू होणार आहे. हाँगकाँगच्या मोंग कोक येथील ‘मिशन रोड ग्राउंड’वर खेळल्या जाणाऱ्या या ६-६ ओव्हर्सच्या या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. भारतीय वेळेनुसार सामना उद्या सकाळी 11.45 वाजता सुरू होणार आहे. हाँगकाँगच्या मोंग कोक येथील ‘मिशन रोड ग्राउंड’वर खेळल्या जाणाऱ्या या ६-६ ओव्हर्सच्या या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी मैदणात उतरणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होत असून त्यांना ३-३ च्या चार गटांत विभागणी करण्यात आली आहे.
हाँगकाँगच्या मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी अनुभवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा एकमेकांशी भिडणार आहेत. येत्या ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा सामना होणार आहे. हा महामुकाबला अंडर -19 आशिया कप 2026 अंतर्गत पार पडणार आहे. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी होणारा हा अंडर-१९ आशिया कपमधील महामुकाबला भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होणार आहे. या बहुप्रतिक्षित सामन्याचे आयोजन ओमानमधील ‘अल अमेरात’ क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहे.
Ans: भारत-पाकिस्तान पहिला सामना उद्या हाँगकाँग सिक्सेसमध्ये होणार आहे.
Ans: भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ अंडर -19 आशिया कपमध्ये भिडणार आहेत.






