भारतात संघ पाठवण्यास पाकिस्तानचा नकार (फोटो- ai gemini)
पाकिस्तान वेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख फवाद एजाज यांनी यासंदर्भात माहिती दिल्याचे समोर आले आहे. स्पर्धेच्या आयोजकांना पाकिस्तान संघाचे नाव मागे घेत असल्याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. भारतीय आयोजक आणि यजमान देशाने पाकिस्तानी वेटरन्स टीमला व्हिसा आणि उच्चस्तरीय सुरक्षा देण्याचे संपूर्ण आश्वासन दिले होते. या आश्वसनानंतर पीव्हीसीएने पीसीबी, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्याकडे NOC ची मागणी केली होती.
Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री? माजी खेळाडूचा मोठा खुलासा
पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी यांनी द्विपक्षीय तणावाचे कारण देत संघाला भारत देशात जाण्यासाठी परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेत मागील वर्षी झालेल्या वेटरन्स वर्ल्ड कप जिंकली होती. परंतु या वेळी त्यांना ते विजतेपद राखता येणार नाहीये.
साल २००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रीडा संबंधांवर विपरीत परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या नापाक कृतींमुळे दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले आहेत. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने जुलै 2008 मध्ये शेवटचा पाकिस्तानमध्ये दौरा केला होता. भारतीय संघाने शेवटची द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी २००५-०६ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता.
ENG Vs PAK: बाबर आझमला इतिहासजमा करा! ४ वर्षे, ३९ डाव अन् झिरो सेंच्युरी, ‘फ्लॉप शो’ कायम
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील दुरावा क्रिकेटपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर तो अन्य खेळांशी देखील जोडला गेला आहे. २००८ नंतर दोन्ही देशांमध्ये कोणतीही द्विपक्षीय हॉकी मालिका खेळवली गेलेली नाही. पाकिस्तान हॉकी संघाने शेवटच्या वेळी २०२३ च्या आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी भारताचा दौरा केला होता. भारतीय पुरुष हॉकी संघाने अखेरची द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी २००६ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. राजकीय आणि सुरक्षा कारणांमुळे क्रिकेटप्रमाणेच भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय हॉकी संबंधही दीर्घकाळापासून लांब गेले आहेत.
Ans: पुढील वर्षी भारतात जानेवारी 2027 मध्ये मास्टर्स क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होणार.
Ans: पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी यांनी द्विपक्षीय तणावाचे कारण देत संघाला भारत देशात जाण्यासाठी परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला.






