दुबई : आशिया कप (Asia Cup) स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. आशिया कप मधील क्रिकेट सामान्यांवर सध्या सर्वांचेच लक्ष असून २८ ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेतील इतर सामान्यांच्या तुलनेत भारत पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामान्यांची तिकिटं ही सर्वात महागडी आहेत. मात्र असे असले तरीही भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) सामन्याची सर्व तिकिटं ही हाऊसफुल्ल झाली आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचचीतिकीटविक्री सुरू झाल्यापासून केवळ अर्ध्या तासात सर्व तिकिटे खरेदी करण्यात आली. आशिया कप स्पर्धेतील इतर सामन्यांची तिकिटे ही ५० दिरहॅम म्हणजे ११०० पयांपासून आहेत आणि भारत पाकिस्तान सामान्याकरीता हेच दर २५० दिरहॅम म्हणजे ५ हजार रुपयांपासून सुरु आहेत. तर महागडी तिकिटे ९ हजार दिरहॅमला म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास १ लाख ९६ हजार रुपयांना आहेत. तिकीट दर काहीही असले, तरी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भरघोस प्रतिसाद लाभला मिळाला आहे.
दुबईच्या याच मैदानावर पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला मोठ्या पराभवाचा झटका दिला होता. त्यामुळे कितीही विसरायचे म्हणाले, तरी पाकिस्तानी खेळाडूंना त्या विजयाचा आधार असणार आणि भारतीय संघाच्या मनात त्या पराभवाची जखम असणार. तेव्हा यंदाच्या आशिया कप मध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.