भारत विरुद्ध श्रीलंका : भारताचा संघ सध्या झिम्बाम्ब्वे दौऱ्यावर आहे. झिम्बाम्ब्वेविरुद्ध झालेल्या चार सामन्यांपैकी भारताच्या संघाने सलग तीन सामने जिंकले आहेत. आज या मालिकेचा शेवटचा सामना रंगणार आहे. भारताच्या संघाने ३-१ असे सामने जिंकून मालिका भारताच्या नावावर केली आहे. त्याचबरोबर हे सामने झाल्यानंतर भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. याचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले होते या वेळापत्रकावर पुन्हा एकदा नजर टाका. भारताचा झिम्बाम्ब्वे दौरा झाल्यानंतर संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौरा आधीच्या वेळापत्रकानुसार २७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
श्रीलंका दौऱ्यामध्ये पहिले T२० सामने होणार आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेत तीन T२० सामने होणार आहेत. त्यानंतर एकदिवसीय सामान्यांना सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी कोणत्या खेळाडूंकडे कर्णधारपद सोपवण्यात येणार आहे असे अजुनपर्यत बीसीसीआयने अधिकृतपणे सांगितले नाही. परंतु हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांच्याकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. T२० सामान्यांची सुरुवात २७ जुलै पासून होणार आहे तर एकदिवसीय सामान्यांची सुरुवात १ ऑगस्टपासून होणार आहे. भारतीय वेळेनुसार T२० सामने संध्याकाळी ७ वाजता सुरु होतील तर एकदिवसीय सामने दुपारी १२.३० ला सुरु होणार आहेत.
क्रमांक | तारीख | सामने | स्थळ | वेळ |
1 | २६ जुलै २०२४ | भारत विरुद्ध श्रीलंका | पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | 19:00 |
2 | २७ जुलै २०२४ | भारत विरुद्ध श्रीलंका | पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | 19:00 |
3 | २९ जुलै २०२४ | भारत विरुद्ध श्रीलंका | पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | 19:00 |
क्रमांक | तारीख | सामने | स्थळ | वेळ |
1 | १ ऑगस्ट २०२४ | भारत विरुद्ध श्रीलंका | Rpics कोलंबो | 12.30 PM |
2 | ४ ऑगस्ट २०२४ | भारत विरुद्ध श्रीलंका | Rpics कोलंबो | 12.30 PM |
3 | ७ ऑगस्ट २०२४ | भारत विरुद्ध श्रीलंका | Rpics कोलंबो | 12.30 PM |