(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अगदी वयातच रंगभूमीवर काम करून आपल्या किरकिर्दीला सुरुवात केलेली ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले आहे. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून आपला ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांना मोठा धक्काच बसला आहे. संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. तसेच अभिनेत्रीने वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या शेवटच्या मराठी मालिका ‘ठरलं तर मग’ या मध्ये काम करताना दिसल्या. या मालिकेचा आणि अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने सगळ्यांचा धक्का बसला आहे.
दिपवीर नाही तर ‘हे’ कलाकार झळकणार होते ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात! ईशा कोप्पीकरचा खुलासा
16 ऑगस्ट रोजी त्यांचे पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, आणि याचवेळी त्यांनी या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. सगळे कलाकार आणि त्यांचे चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना देखील मांडताना दिसत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची मालिका आणि चित्रपट कारकीर्द खूप मोठी आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. त्या जरी आता या जगात नसल्या तरी त्या नेहमीच प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहणार आहे.
‘ठरलं तर मग’ या मालिकेत अभिनेत्रीने ‘पूर्णाआजी’ ची भूमिका साकारली होती. तसेच घराघरात पोहोचलेले हे पात्र आजही प्रेक्षक विसरू शकत नाहीत. या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतला आहे. फक्त वयाच्या १२ व्या वर्षी रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या ज्योतींनी तब्बल २०० हून अधिक पुरस्कार स्वतःच्या नावावर केले आहेत. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी ‘पुलावत’, ‘सलाम’, ‘ढोलकी’, ‘संजपर्व’, ‘आई तिचा उंबरठा’, ‘आई ढोलकी’, ‘पौलत’ अशा चित्रपटांमध्ये काम करून या सगळ्या भूमिका गाजवल्या आहेत.
फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
ज्योती चांदेकर या प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई आहेत. तसेच, २०१५ मध्ये आई-मुलीला एकाच वेळी पुरस्कार मिळाला होता. ज्योतींनी ‘आई तिचा उंबरठा’मध्ये आपल्या मुलीच्या सासूची भूमिका साकारली आणि पडद्यावरच नव्हे तर वास्तवातही या आई-मुलीच्या नात्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. या दोघींमधील प्रेमळ नातं नेहमीच प्रेक्षकांना दिसून आले आहे. त्यांच्या जाण्याने सोशल मीडियावर चाहते आणि सहकलाकारांनी श्रद्धांजलीचा वर्षाव केला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने खास पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ज्योती चांदेकर या फक्त अभिनेत्री नव्हत्या, तर मराठी घराघरातील “आज्जी” होत्या. त्यांचा मंद हसरा चेहरा, गोड आवाज आणि अभिनयाची जादू मराठी रसिकांच्या मनात कायम राहील. त्यांचा गोड चेहरा आणि मनमिळावू स्वभाव नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहणार आहे.