(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या स्पर्धेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या स्पर्धेत अशी काही मजेदार आणि अनोखी दृश्ये दिसून आली की पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक घडलं असं की, एका धावण्याच्या स्पर्धेत लग्न केलेल्या सर्व बायका पाळताना दिसून आल्या आता तुम्ही म्हणाल की यात आश्चर्य काय तर… बायका धावण्याच्या स्पर्धेत पळत आहे हे आश्चर्य नाही तर यावेळी त्या आपल्या नवऱ्याला कमरेवर चढवत त्याला घेऊन या रेसमध्ये पळत आहेत हे व्हिडिओचं खरंतर आश्चर्य आहे. ही अनोखी स्पर्धा आता सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधत असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हिडिओ नक्की कुठला आहे याची पुष्टी अद्याप झाली नसली तरी यातील अजब-गजब दृश्यांमुळे तो इंटरनेटवर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. ही शर्यत स्पर्धा १०० मीटरची होती, ज्यामध्ये महिलांना त्यांच्या पतींना कमरेवर घेऊन धावावे लागते. या शर्यतीचा उद्देश केवळ मनोरंजन नाही तर लैंगिक समानतेबद्दल जागरूकता पसरवण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. या शर्यतीत सर्व वयोगटातील जोडपी भाग घेतात. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका खुल्या मैदानात धावण्याची शर्यत सुरु असून सर्व महिला धावत पळत जाऊन आपल्या नवरोबाला कमरेवर उचलून शर्यतीत पळताना स्पर्धेत दिसून येतात. हा अनोखा कार्यक्रम पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांना हसू आवरता आले नाही.
अनोख्या शर्यतीचा हा व्हिडिओ @studentgyaan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी माझ्या पत्नीला उचलूही शकत नाही आणि या महिला त्यांच्या पतींना घेऊन धावत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बस अशीच माझे नखरे उचलणारी कोणी भेटली पाहिजे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.