Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा अंडर-१९ संघ जाहीर, राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात एन्ट्री; कधी अन केव्हा होणार सामने?

BCCI Announced U-19 Team For Sri Lanka tour: बीसीसीआयच्या ज्युनियर क्रिकेट समितीने श्रीलंकेविरुद्धच्या १९ वर्षांखालील एकदिवसीय आणि बहुदिवसीय मालिकांसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. या संघात राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड यालाही संधी मिळाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 11, 2026 | 04:07 PM
IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा अंडर-१९ संघ जाहीर, राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात एन्ट्री; कधी अन केव्हा होणार सामने?
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर
  • द्रविडच्या मुलाची टीम इंडियात एन्ट्री
  • कधी अन केव्हा होणार सामने
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ज्युनियर क्रिकेट समितीने गुरुवारी (दि. ११ जून) श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि बहुदिवसीय सामन्यांसाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा केली. दोन्ही मालिकांसाठी स्वतंत्र १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आले आहेत. पहिली मालिका तीन एकदिवसीय सामन्यांची असेल, तर त्यानंतर दोन बहुदिवसीय म्हणजेच मल्टी-डे सामन्यांची मालिका खेळवली जाईल. भारताचे माजी खेळाडू आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा धाकटा मुलगा अन्वय द्रविड याचीही एकदिवसीय मालिकेच्या संघात निवड झाली आहे. भारतीय १९ वर्षांखालील संघाचा श्रीलंका दौरा ४ जुलैपासून सुरू होईल, ज्यासाठी यशवर्धन सिंग चौहानची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ICC ODI Rankings मध्ये भारत पुन्हा अव्वल; न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला टाकले मागे, पाहा टॉप-10 संघांची यादी

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ सज्ज

श्रीलंका दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होईल. पहिला सामना ४ जुलै रोजी, तर दुसरा सामना ६ जुलै रोजी खेळला जाईल. तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना ९ जुलै रोजी खेळला जाईल. हे तिन्ही सामने हंबनटोटा या एकाच ठिकाणी आयोजित केले जातील. यानंतर १३ ते १६ जुलै दरम्यान गॉल येथे पहिला मल्टी- डे सामना होईल. दुसरा बहुदिवसीय सामना २० ते २३ जुलै दरम्यान कोलंबो येथे खेळला जाईल.

अन्वय द्रविडची टीम इंडियात एन्ट्री

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात रोहित, अनिल यादव आणि ईशान सूद यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. रजत बघेल आणि अन्वय द्रविड यांची एकदिवसीय संघात यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे. मात्र, बहुदिवसीय सामन्यांच्या संघात अन्वयचा समावेश करण्यात आलेला नाही. बहुदिवसीय सामन्यांमध्ये मानव कृष्णा आणि आर्यन संदेश सकपाल यष्टीरक्षक असतील. यशवर्धन सिंग चौहान एकदिवसीय मालिका तसेच बहुदिवसीय सामने या दोन्हीमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसेल. या दोन्ही मालिकांमध्ये लक्ष्य रायचंदानी उपकर्णधार असेल.

🚨 News 🚨 India Men’s U19 squads for Sri Lanka series announced. More Details 🔽https://t.co/tGJ7FRywxK — BCCI (@BCCI) June 11, 2026

भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना – ४ जुलै, हंबनटोटा
  • दुसरा एकदिवसीय सामना – ६ जुलै, हंबनटोटा
  • तिसरा एकदिवसीय सामना – ९ जुलै, हंबनटोटा

भारत विरुद्ध श्रीलंका बहुदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना – १३-१६ जुलै, गॉल
  • दुसरा सामना – २० ते २३ जुलै, कोलंबो.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय १९ वर्षांखालील संघ:

सागर विर्क, लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), विनीत व्हीके, अर्जुन राजपूत, कुशाग्र ओझा, रजत बघेल (यष्टीरक्षक), अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), अनमोलजीत सिंग, वुटकुरी यशवीर गौड, रोहित अनिल यादव, शाविन वी, काव्या परेश पटेल, मोहित उलवा, इशान सूद.

बहु-दिवसीय सामन्यांसाठी भारताचा अंडर 19 संघ:

सागर विर्क, लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), पटेल कुश, मनाल चौहान, कुशाग्र ओझा, मानव कृष्णा (यष्टीरक्षक), आर्यन संदेश सकपाळ (यष्टीरक्षक), हेमचुदेशन जे, बीके किशोर, रोहित, रोहित अनिल यादव, काव्या परेश पटेल, प्रियांशु सिंग, प्रणव राघवेंद्र, चिगुरुपती व्यंकट.

FIFA World Cup 2026 : एक ट्रॉफी, 48 दावेदार! आजपासून रंगणार FIFA चा थरार; पहिला सामना कधी अन् कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर

Web Title: India u19 squad sri lanka tour anvay dravid selected yashvardhan singh captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • BCCI India
  • indian cricket team
  • Rahul Dravid

संबंधित बातम्या

Ajit Aagarkar : BCCIची वार्षिक बैठक संपली, निवड समिती अध्यक्ष अजीत आगकरांबाबत मोठा निर्णय
1

Ajit Aagarkar : BCCIची वार्षिक बैठक संपली, निवड समिती अध्यक्ष अजीत आगकरांबाबत मोठा निर्णय

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?
2

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली
3

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड
4

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.