Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: मैदानात रोहित शर्मा पाऊल ठेवताच तुटणार 37 वर्ष जुना रेकॉर्ड, सचिन-विराट तर कोसो दूर

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा एक मोठा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. तो भारतासाठी एक अशी कामगिरी करणार आहे, आजपर्यंत इतर कोणत्याही खेळाडूने केलेली नाही. अगदी तेंडुलकरही हा रेकॉर्ड करू शकला नाही

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 12, 2026 | 05:00 PM
रोहित शर्मा नव्या रेकॉर्डसाठी सज्ज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

रोहित शर्मा नव्या रेकॉर्डसाठी सज्ज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रोहित शर्मा मोडणार ३७ वर्ष जुना रेकॉर्ड 
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तानच्या एकदिवसीय सामन्यात रोहित करणार मोठी कामगिरी 
  • असा रेकॉर्ड करणारा ३७ वर्षानंतरचा हा भारतीय खेळाडू 
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १३ जून रोजी सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याची सर्वच जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कारण सर्वांचा लाडका रोहित शर्मा पुन्हा खेळताना दिसणार आहे. 

रोहित शर्माला एकदिवसीय मालिकेत खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच रोहित एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठेल आणि एक नवा विक्रम सेट करेल. हा विक्रम करणारा तो ३७ वर्षानंतर भारतीय खेळाडू ठरणार आहे. सचिन तेंडुलकर वा विराट कोहली यासारख्या दिग्गजांना मागे टाकून रोहित शर्माच्या नावावर हा रेकॉर्ड होणार आहे. 

रोहित शर्मा एक मोठा विक्रम मोडणार

खरं तर, जर रोहित शर्माने धर्मशाळा मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला, तर तो भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरेल. रोहित मोहिंदर अमरनाथ यांच्या नावावर असलेला ३७ वर्षांचा जुना विक्रम मोडणार आहे. रोहित शर्मा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने सराव सामन्यातही चांगली खेळी करून दाखवली होती. त्यामुळे अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात रोहितकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

IND Vs AFG ODI: रोहित शर्मा कमबॅकसाठी सज्ज! भारत-अफगाणिस्तान आमनेसामने; पहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

रोहित एक मोठा विक्रम मोडणार

मोहिंदर यांनी वयाच्या ३९ वर्षे आणि ३६ दिवसांनी आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. शनिवारी अर्थात १३ जून, २०२६ रोजी रोहित शर्माचे वय हे ३९ वर्षे आणि ४४ दिवस इतके असेल. एकूणच, एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वयस्कर खेळाडू नेदरलँड्सचा नोलन क्लार्क आहे, जो ४७ वर्षे आणि २५७ दिवसांच्या वयात खेळला होता. 

न्यूझीलंडविरुद्ध खेळला

रोहितची शेवटची एकदिवसीय मालिका या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध झाली होती. तीन सामन्यांच्या मालिकेत रोहितची कामगिरी सामान्य होती. त्यामुळे, चाहते अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या या माजी कर्णधाराकडून दमदार कामगिरीची अपेक्षा करतील. ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध रोहितचा रेकॉर्ड चांगला आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध उत्कृष्ट रेकॉर्ड

तीन सामन्यांमध्ये रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध ७५ च्या सरासरीने आणि १२७ च्या स्ट्राइक रेटने १५० धावा केल्या आहेत. या काळात रोहितने एक शतकही झळकावले आहे. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्या अनुपस्थितीत रोहितवर अधिक जबाबदारी असेल. दुखापतीमुळे कोहली आणि हार्दिक या मालिकेत नाहीत. विराट हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त आहे, तर हार्दिकच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. विराटच्या जागी यशस्वी जयस्वालला संघात स्थान देण्यात आले आहे. 

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण पुढे ढकलणार? भारताच्या आयर्लंड दौऱ्यावर संकटाचे ढग, देशात हिंसाचार भडकला

Web Title: India vs afghanistan rohit sharma ready to break 37 year old record in first odi against afg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Record
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
1

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
2

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
3

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

IND vs AFG  : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..
4

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.