रोहित शर्मा (फोटो- ians)
अफगणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा नवा रेकॉर्ड रचणार
रोहित शर्माने पार केली फिटनेस टेस्ट
मोहिंदर अमरनाथचा रेकॉर्ड मोडण्याची संधी
India Vs Afghanistan ODI Series: 13 जूनपासून भारत आणि अफगणिस्तान यांच्यात एकदिवसीय सिरिज सुरू होणार आहे. एकमेव कसोटी सामन्यात अफगणिस्तानवर भारताने एक डाव 300 रन्सने विजय मिळवला आहे. दरम्यान वनडे सिरिजमध्ये भारत अफगणिस्तानविरुद्ध भिडणार आहे. रोहित शर्मा देखील या सिरिजमध्ये खेळणार आहे. त्याने फिटनेस टेस्ट पार केली. मात्र रोहित शर्मा या सिरिजमध्यी खेळून एक रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे.
भारतीय संघ आतापासूनच आयसीसी पुरुष विश्वचषक 2027 च्या (ICC World Cup) तयारीला लागला आहे. या मोहिमेची सुरुवात येत्या १३ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. भारताचा अनुभवी खेळाडू आणि पूर्व कर्णधार रोहित शर्मा याने फिटनेस टेस्ट पास केली असून तो या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.
रोहित शर्मा या सिरिजमध्ये रन्सचा पाऊस पाडण्यासाठी उत्सुक असणार आहे. मात्र तो या सिरिजमध्ये एका रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनी वयाच्या 38 व्या वर्षी भारतासाठी वन-डे क्रिकेट खेळताना एक मोठा टप्पा गाठला होता. रोहित शर्मा आता जवळपास 39 वर्षांचा होत आला आहे. जर रोहितने या मालिकेत शानदार कामगिरी केली, तर तो भारतासाठी वयाच्या ३९ व्या वर्षी वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय खेळाडू होणार आहे.
नेट्समध्ये दिसला रोहित शर्माचा धमाका
भारतीय संघाच्या सराव सत्राला १० जून रोजी मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर सुरुवात झाली. सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर होत्या. बऱ्याच कालावधीनंतर रोहित नेटमध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरला. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहितने खूप घाम गाळून आपली तयारी दाखवून दिली. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा तंदुरुस्तीच्या कारणास्तव खेळापासून दूर होता. मात्र या मालिकेत तो भारतीय टीमकडून मैदानावर उतरणार आहे. यावेळी रोहितने मैदानात नेट्स प्रॅक्टिस केली आणि सर्वांचे मन जिंकले. दमदार प्रदर्शन करत त्याने आपण खेळण्यासाठी सज्ज आहोत हे दाखवून दिले.
भारतीय संघाच्या शिबिरात यावेळी अनेक तरुण चेहरे आहेत. नवीन टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव यांसारखे खेळाडूही सराव करत होते, पण रोहित शर्माने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तंदुरुस्तीबद्दल सतत चर्चा सुरू होती आणि त्याच्या मोहालीतील पुनरागमनाने या सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिला.






